Wada Crime : हळदी समारंभात भगताच्या अंगात वारं, भुताटकीचा आळ आणत महिलेची अवहेलना
वाडा तालुक्यातील बेरशेती गावात अनंता पाटील यांचा मुलगा रूपेशच्या विवाहानिमित्तानं 25 मे रोजी रात्री हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पारंपरिक पध्दतीने कुळदैवतांची पूजा अर्थात देवादेवी सुरु होती. पूजा सुरु असतानाच सागर विनायक पाटील आणि करण अंकुश पाटील ह्या दोघा भगतांच्या अंगात वारा आला. त्यांनी घरातील सर्व उपस्थितांना मांडवात जायला सांगितले.
वाडा / शशिकांत कासार : हळदी समारंभात अंगात वारा आल्याचं म्हणत एका महिलेवर भुताटकीचा आळ घेत तिची अवहेलना (Contempt) केल्याची धक्कादायक घटना वाडा तालुक्यातील बेरशेती गावात घडली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी (Atrocity) आणि जादूटोणा (Witchcraft), अनिष्ट प्रथा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विनायक पाटील आणि करण अंकुश पाटील अशी आरोपींची नावे आहेत. हळदी समारंभातील अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी अशी ही दृष्य आहेत. एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरविण्यात आले आणि सार्वजनिकपणे तिची अवहेलना करतात.
कुळदैवताची पूजा सुरु असतानाच भगतांचा अंगात वारा येण्याचे नाटक
वाडा तालुक्यातील बेरशेती गावात अनंता पाटील यांचा मुलगा रूपेशच्या विवाहानिमित्तानं 25 मे रोजी रात्री हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पारंपरिक पध्दतीने कुळदैवतांची पूजा अर्थात देवादेवी सुरु होती. पूजा सुरु असतानाच सागर विनायक पाटील आणि करण अंकुश पाटील ह्या दोघा भगतांच्या अंगात वारा आला. त्यांनी घरातील सर्व उपस्थितांना मांडवात जायला सांगितले. त्यानंतर मंडपामध्ये भंडारा उधळत सागरने एका आदिवासी महिलेच्या हाती पहार देत मंडपाच्या मध्यभागी असलेल्या खांबाजवळ खोदायला सांगितले.
महिलेने नकार दिल्यावर जबरदस्तीने तिच्या मानेला धरत तिला या खांबाजवळ बसविले. त्यानंतर सागरने त्या खोदलेल्या जागेतून देवीची लहान मूर्ती काढली आणि या महिलेपासून सावध रहा असे ओरडून सांगू लागला. त्या महिलेची ओवाळणी करत तिच्या अंगावर भंडारा उधळला आणि नारळ देखील फोडला. त्यानंतर या महिलेबद्दल जातीवाचक बोलत ती भुताटकी करतेय असा आरोप या भगतांनी तिच्यावर लावल्याने उपस्थित पाहुण्यांसमोर तिची अक्षरशः मानहानी केल्याची गंभीर घटना घडली आहे. (A tribal woman was denigrated under the guise of witchcraft in Wada taluka)