Kalyan Crime : उत्तर प्रदेशमधून गावठी कट्टा घेऊन आला अन् कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला

एक तरुण गावठी कट्टा घेऊन कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजरपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात गस्त वाढवत सापळा रचला. महेश पवनीकर हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोविंदवाडी परिसरात आला. त्याच्या हालचालींवरुन पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महेशला ताब्यात घेत त्याची झडती घेतली.

Kalyan Crime : उत्तर प्रदेशमधून गावठी कट्टा घेऊन आला अन् कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला
https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/maharashtra-crime-news-palghar-missing-engineering-student-found-dead-in-well-family-suspect-murder-669558.htmlImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 4:17 PM

कल्याण : उत्तर प्रदेशमधून डोंबिवलीत गावठी कट्टा (Pistol) आणि जिवंत काडतुसे (Cartridges) घेऊन येणाऱ्या तरुणाला बाजार पेठ पोलिसांनी कल्याण गोविंदवाडी परिसरातून अटक (Arrest) केली आहे. महेश पवनीकर असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली आजदेपाडा येथील रहिवासी आहे. आपल्यावर हल्ला होणार असल्याने स्वरक्षणासाठी गावठी कट्टा  आणि 2 जिवंत काडतूस आणल्याचा दावा आरोपीने केला आहे. प्रत्यक्षात त्याने हा कट्टा कशासाठी कुठून आणला ? याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या आरोपीकडे घातक अग्निशस्त्र सापडू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. (Accused arrested for bringing pistol and cartridges from Uttar Pradesh in Kalyan)

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला

एक तरुण गावठी कट्टा घेऊन कल्याण पश्चिम गोविंदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजरपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात गस्त वाढवत सापळा रचला. महेश पवनीकर हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोविंदवाडी परिसरात आला. त्याच्या हालचालींवरुन पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महेशला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यामध्ये त्याच्याजवळ विना परवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस आढळून आले. दरम्यान हा गावठी कट्टा आपण उत्तर प्रदेशमधून आणले असल्याचे सांगतानाच आपला अनेक जणांशी वाद असून या वादातून आपल्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने आपण स्वरक्षणासाठी स्वतः उत्तर प्रदेशमधून खरेदी करून आणल्याचा दावा पोलिस तपासात केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत पिस्तुल जप्त करत आरोपीला अटक केली आहे.

लातूरमध्येही तीन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूसे जप्त

लातूर शहरात तीन गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळालेल्या माहितीनुसार गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या एका आरोपीला अटक करण्याती आली. समीर शेख-पांढरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीची कसून चौकशी केली असता आणखी एकाच्या घरी लपवलेले दोन गावठी कट्टे आणि 11 काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. घातपाताच्या उद्देशाने हा आरोपी लातूर शहरातल्या इंडिया नगर भागात गावठी कट्टा घेऊन फिरत होता. (Accused arrested for bringing pistol and cartridges from Uttar Pradesh in Kalyan)

इतर बातम्या

Kushinagar: चार लेकरं तर गेलीच पण टॉफीवर बसलेल्या माशाही मेल्या, शेवटी मुक्या जीवानं आरोपी शोधलेच

Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अर्भक रस्त्यावर सोडले, तिघांना अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.