धक्कादायक ! प्रेयसीला अडकवण्यासाठी प्रियकराने रचला भयंकर कट, अंबरनाथमधील तरुणाच्या हत्येची उकल

पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून तो छातीत दुखत असल्याचा बहाणा करून एका खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल झाला. दुसरीकडे 1 एप्रिल रोजी सकाळी पोलिसांना अमित याचा मृतदेह आणि त्याच्या खिशात चिठ्ठी, अनिताचं मतदार ओळखपत्र आढळताच त्यांनी अनिताला ताब्यात घेतलं.

धक्कादायक ! प्रेयसीला अडकवण्यासाठी प्रियकराने रचला भयंकर कट, अंबरनाथमधील तरुणाच्या हत्येची उकल
प्रेयसीला अडकवण्यासाठी प्रियकराने रचला भयंकर कटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 7:39 PM

अंबरनाथ : एखाद्या चित्रपटात किंवा क्राईम पेट्रोलमध्ये शोभावी अशी मर्डर मिस्ट्री अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. प्रेयसीला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका इसमाने निष्पाप तरुणाचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्याची उकल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वामन मारुती शिंदे (39) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात राहणाऱ्या वामन मारुती शिंदे याचे त्याच परिसरात राहणाऱ्या अनिता काठे हिच्यासोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध (Love Affair) होते. मात्र गेल्या वर्षी वामन हा एका गुन्ह्यात काही महिने नाशिक कारागृहात होता. या कालावधीत अनिता हिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय वामन याला होता. याच संशयातून त्याने अनिताला अद्दल घडवण्याच्या हेतूने तिला अडकवण्याचा कट रचला. (Accused arrested for killing a young man on suspicion of charactor of girlfriend)

कशी घडवली हत्या ?

प्लाननुसार वामनने आधी अनिताला एका लॉजवर घेऊन जात तिच्याकडून तिचं मतदार ओळखपत्र घेतलं. त्यानंतर त्याने मुलीकडून अनिताच्या नावाने एक चिठ्ठी लिहून घेतली, ज्यात तिचा फोन नंबरही टाकला. यानंतर त्यानं हँडग्लोव्हज आणि एक चाकू विकत घेतला आणि त्या चाकूला धारही लावून आणली. त्यानंतर त्यानं 31 मार्च रोजी संध्याकाळी त्याने कल्याणला जाऊन अमित उर्फ आंडवा या मजुराला काहीतरी काम देण्याच्या बहाण्याने बदलापूरला आणलं. तिथून रिक्षाने गणपत ढाब्यासमोरील एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर तो त्याला घेऊन गेला आणि तिथे त्याने अमित याची चाकूने गळा चिरून हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्यानं अनिताकडून घेतलेलं तिचं मतदान ओळखपत्र आणि मुलीकडून अनिताच्या नावाने लिहून घेतलेली चिठ्ठी अमित याच्या खिशात ठेवली आणि तिथून पळून गेला.

पोलिसांना चकवण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला

पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून तो छातीत दुखत असल्याचा बहाणा करून एका खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल झाला. दुसरीकडे 1 एप्रिल रोजी सकाळी पोलिसांना अमित याचा मृतदेह आणि त्याच्या खिशात चिठ्ठी, अनिताचं मतदार ओळखपत्र आढळताच त्यांनी अनिताला ताब्यात घेतलं. मात्र तिने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आपण आपलं मतदार ओळखपत्र हे वामन शिंदे याला दिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी वामन याला उचलून आणत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

केवळ संशयापोटी निष्पापाचा बळी

केवळ दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याच्या संशयपोटी अनिताला अडकवणं इतकाच हेतू वामन शिंदे याचा होता. मात्र तिला अडकवण्याच्या नादात एका निष्पाप तरुणाचा बळी त्यानं घेतला आणि शेवटी स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी वामन शिंदे याला काही तासात बेड्या ठोकल्या खऱ्या; मात्र त्याच्याकडून गुन्हा कसा आणि का केला? हे कबूल करून घेताना मात्र पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. मात्र अखेर वामन याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याची रवानगी कोठडीत झाली. (Accused arrested for killing a young man on suspicion of charactor of girlfriend)

इतर बातम्या

Gadchiroli Murder : गडचिरोलीत अज्ञात कारणावरुन प्रियकराकडून प्रेयसीची अपहरण करुन हत्या

Parali Morcha : नांदेडमधील संजय बियाणी हत्या प्रकरण, आरोपींच्या अटकेसाठी माहेश्वरी समाजाचा मूक मोर्चा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.