AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण ! 116 नागरिकांना दिली भेसळयुक्त लस, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई पाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण ! 116 नागरिकांना दिली भेसळयुक्त लस, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
लसीकरण मोहीम
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 9:47 PM
Share

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने 116 जणांना बोगस लस टोचून एक लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. (after Mumbai fake vaccination drive in Thane case registered against five accused)

मुंबईत बोगस लसीकरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचे चौकशीत समोर आले. यामध्ये आरोपी महेंद्र सिंग व त्याचे सहकारी श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा व करीम यांनी 26 मे 2021 रोजी श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपणीसाठी लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्येक लसीसाठी 1 हजार रुपये

कंपणीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी भेसळयुक्त, बनावट कोविशील्डचे डोस दिले. त्यासाठी प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये याप्रमाणे 116 जणांच्या लसीकरणासाठी एक लाख 16 हजार रुपये वसूल केले. विशेष म्हणजे बनावट लसीकरण केल्यानंतर त्यातील चार जणांना कोविशील्ड लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्रही यावेळी देण्यात आले.

सर्व आरोपी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांनी बनावट लसीकरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर फसवणूक झालेल्या ठाण्यातील रेन्युबाय डॉट कॉम या कंपनीचे क्लस्टर सेल मॅनेजर उर्णव दत्ता यांनीसुद्धा नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. सध्या हे सर्व आरोपी मुंबईत अटकेत असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी दिली.

मुंबईतही बोगस लसीकरण

मुंबईत बोगस लसीकरण शिबीर आयोजित केल्याचा प्रकार आज (25 जून) उघडकीस आला. या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यानंतर वरिष्ठ आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली. “यात आतापर्यंत सात गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे,” असं नांगरे पाटील म्हणाले.

“या संपूर्ण गुन्ह्यांचा बारकाईने तपास होणे अपेक्षित असल्याने SIT स्थापन केली. पहिलं शिबीर हिरानंदानी येथे आयोजित केला होते. सर्वांना कोविशील्ड लस देण्यात आली. संबधित लस घेतल्याचं प्रमाणपत्र हाती आल्यानंतर जागा, वेळ या वेगवेगळ्या असल्याने रहिवाशांना संशय आला. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे,” असं नांगरे पाटलांनी सांगितलं.

इतर बातम्या :

ईडीची दिवसभर छापेमारी, नागपूर-मुंबईच्या निवासस्थानी धाडी, अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?

पर्सनल सेक्रेटरी आणि पीए ईडीच्या ताब्यात, चौकशींचे खलबतं सुरु, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

Maharashtra Unlock: संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय

(after Mumbai fake vaccination drive in Thane case registered against five accused)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.