अंबरनाथच्या ओढ्यात हजारो मृत माशांचा खच, पोल्ट्री फार्मच्या कचऱ्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
मात्र गेल्या दोन दिवसांपासून या ओढ्यामध्ये अचानकपणे माशांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या ओढ्यावर अक्षरशः हजारो मृत माशांचा खच जमा झाला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात ओढ्यातील हजारो माशांचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या ओढ्यात पोल्ट्री फार्मचा कचरा सोडण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. (Ambernath runnel fish killed due to poultry farm waste)
ओढ्यावर हजारो मृत माशांचा खच जमा
अंबरनाथच्या मलंगगड परिसरातून करवले, कुंभार्ली, शेलार पाडा या गावांमधून एक ओढा वाहतो. या ओढ्यात स्थानिक ग्रामस्थ मासेमारी करून हे मासे शहरात नेऊन विकतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या ओढ्यामध्ये अचानकपणे माशांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या ओढ्यावर अक्षरशः हजारो मृत माशांचा खच जमा झाला आहे.
यानंतर स्थानिकांनी माशांचा मृत्यू का झाला? याचा शोध घेतला असता, पाण्यावर एक प्रकारचा तवंग आणि पांढरा फेस आढळून आला. त्यामुळे पाण्यात कोणीतरी केमिकल सोडल्यामुळे आणि या भागातील पोल्ट्री फार्मने पाण्यात कचरा सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मासे खाऊन विषबाधा झाली तर काय?
या परिसरात अनेक जीन्सचे कारखाने आहेत. यातून या ओढ्यात प्रदूषित पाणी सोडत असतात. त्यामुळे आता माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याच्या कारणांचा शोध घेणं गरजेचं बनलं आहे. दरम्यान, काही स्थानिकांनी या ओढ्यातील मासे शहरात विकण्यासाठी नेले होते. त्यामुळे आता हे मासे खाऊन विषबाधा झाली तर काय? अशी भीती व्यक्त होतं आहे. त्यामुळे काही दिवस ओढ्याच्या पाण्यातले मासे न खाण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.
सरकारला आदित्य, रोहित, पार्थच्या भविष्याची चिंता, गोरगरिब पोरांची नाही, आ. राम सातपुतेंचा हल्लाबोलhttps://t.co/8uqkavzj02@RamVSatpute @OfficeofUT @AjitPawarSpeaks #MPSC #mpscexam
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
(Ambernath runnel fish killed due to poultry farm waste)
संबंधित बातम्या :
मौजमजा करण्यासाठी फिरायला आले, समुद्रात पोहताना खोल पाण्यात गेल्यामुळे दोघांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बळीराजा अडचणीत