रुग्णवाहिका फिरवून घेताना धक्का लागला; फेरीवाल्यांचे धक्कादायक कृत्य

फूटपाथला लागूनच हे फेरीवाले बसत असल्याने काही कडापे त्यांनी या ठिकाणी ठेवले आहेत. रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी चालक रुग्णवाहिका फिरवून घेत होता.

रुग्णवाहिका फिरवून घेताना धक्का लागला; फेरीवाल्यांचे धक्कादायक कृत्य
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 7:43 AM

ठाणे : महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांची बोटं छाटल्याचे प्रकरण ताजं आहे. असं असतानाच डोंबिवली (Dombivli) पूर्व येथे फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका (ambulance) चालकासोबत धक्कादायक कृत्य केलं. फेरीवाले रस्त्याच्या शेजारी बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. असे असताना अपघात होण्याची शक्यता असते. किंवा धक्का लागल्यास वाद होत असतात. असे वाद आता जास्त प्रमाणात होताना दिसतात. असंच एक प्रकरण समोर आलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. फेरीवाले ही जागा स्वतःच्या मालकीची समजतात काय, असा प्रश्नही निर्माण होतो.

रुग्णवाहिका चालकास मारहाण

रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना समोर आली. या मारहाणीत रुग्णवाहिका चालक जखमी झाला आहे. गणेश माळी असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील पूजा मधुबन चित्रपट गृहासमोर असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. याच रुग्णालयाच्या रस्त्यावर आजूबाजूला अनेक फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे.

हे सुद्धा वाचा

रुग्णवाहिका चालकास जाब विचारला

फूटपाथला लागूनच हे फेरीवाले बसत असल्याने काही कडापे त्यांनी या ठिकाणी ठेवले आहेत. काल दुपारी रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी चालक रुग्णवाहिका फिरवून घेत होता. तेवढ्यात फुटपाथवर ठेवलेल्या एका कडाप्याला रुग्णवाहिकेची धक्का लागला. यामुळे येथे बसणारे फेरीवाले रुग्णवाहिका चालकाला जाब विचारण्यासाठी आले. त्याच्याशी बाचाबाची करू लागले. बाचाबाची करताना संतप्त झालेले या फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण केली.

घटना सीसीटीव्हीत कैद

यामुळे हा रुग्णवाहिका चालक जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या संदर्भात त्याने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत. डोंबिवलीत पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. रुग्णवाहिका फिरवून घेत असताना धक्का स्टॉलला लागला. म्हणून रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण केली. डोंबिवली पूर्वेतील पूजा मधुबन टॉकीज समोर प्रकार घडला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.