गृहिणींचे बजेट कोलमडले!; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भाव

पावसामुळे टोमॅटो अधिक लालबुंद झाला. मिरचीच्या तिखटपणासाठीदेखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे.

गृहिणींचे बजेट कोलमडले!; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे भाव
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 5:39 PM

ठाणे : पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी उन्हाळा होता. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादन कमी झाले. मागणी नेहमीसारखीच आहे. या कारणामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वत्र पावसाचे जोरदार आगमन होत आहे. मात्र या पावसामुळे गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले. भाज्यांचे भाव गगनाला भिडले. सामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच फोडणी बसत आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढले असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तर 50 ग्राहक येतात भाव विचारतात आणि त्यापैकी फक्त एखादा दुसरा ग्राहक भाजीपाला घेऊन जातो अशी माहितीही भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.

पावसामुळे टोमॅटो अधिक लालबुंद झाला. मिरचीच्या तिखटपणासाठीदेखील अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र भाज्यांचे भाव ऐकून नागरिक भुवया उंचावताना दिसतात.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव ( प्रतिकिलो)

टोमॅटो 70 ते 100

भेंडी 60 ते 80

दुधी भोपळा 50 ते 60

फरसबी 100 ते 120

फ्लावर 50 ते 60

गवार 60 ते 80

घेवडा 100 ते 120

काकडी 60 ते 70

कारली 60 ते 70

कोबी 50 ते 60

ढोबळी मिरची 60 ते 80

शेवग्याची शेंग 80 ते 100

वाटाणा 100 ते 120

वांगी 60 ते 70

मिरची 100 ते 120

धुळ्यातही भाजीपाल्याचे दर गगनाला

धुळे शहरात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने मिळणारा भाजीपाला तब्बल 100 रुपये किलोपर्यंत मिळत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. जून महिना उलटायला आला मात्र पाऊस न झाल्याने धुळे शहरात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला हा आता तब्बल 100 रुपये पर गेला आहे.

तीस रुपये किलो भेटणारी कोथंबिर 160 रुपये किलो, दहा रुपये किलो भेटणारे टमाटे 80 रुपये, गिलके 80, मिरची 100 रुपये, अद्रक १२० वांगे 80 किलो दराने मिळत आहेत. सध्या शहारालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. मात्र पाऊस नसल्याने गावांमधील भाजीपालाची आवक घटली आहे. शहरात नाशिक मंचर वाशी येथील भाजीपाला विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.