कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात

सोनू उर्फ नाककट्या नावाच्या व्यक्तीने बिपीनवर हल्ला करण्यासाठी 10 हजार दिल्याचे अल्पवयीन मुलांनी पोलिस चौकशीत सांगितले. पोलिसांनी सोनू उर्फ नाककट्याला ताब्यात घेतलं. सोनूला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रमोद चौहान याने मला 25 हजार रुपये दिल्याचे सांगितले.

कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात
कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 5:01 PM

कल्याण : कल्याण पुर्वेतील चाळ कॉन्ट्रॅक्टर हल्ला (Attack) प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपीं (Accuse)ना ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मुलांना हल्ला करण्यासाठी 10 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. चाळीतले घर बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोटेशनवरून एका कॉन्ट्रॅक्टरने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची सुपारी दिली होती. या घटनेच्या निमित्ताने चाळीतील घरे दुरुस्त करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये देखील जीवघेणी स्पर्धा असल्याचे दिसून आले. (Attack on a contractor in Kalyan over a business dispute)

आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश

कल्याण पुर्वेतील खडगोलवली परिसरात राहणारे विपीन मिश्रा या चाळ कॉन्ट्रॅक्टर असून चाळीतील घरे दुरुस्तीचे काम ते करतात. काही दिवसांपूर्वी काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात विपीन मिश्रा यांना गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणाचा तपास डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना पोलिसांनी तपास करत या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलांकडून झालेला खुलासा धक्कादायक होता.

व्यावसायिक वादातून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने दिली सुपारी

सोनू उर्फ नाककट्या नावाच्या व्यक्तीने बिपीनवर हल्ला करण्यासाठी 10 हजार दिल्याचे अल्पवयीन मुलांनी पोलिस चौकशीत सांगितले. पोलिसांनी सोनू उर्फ नाककट्याला ताब्यात घेतलं. सोनूला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रमोद चौहान याने मला 25 हजार रुपये दिल्याचे सांगितले. कोळसेवाडी पोलिसांनी प्रमोद चव्हाण याला ताब्यात घेतलं. प्रमोद चव्हाण हा देखील चाळ कॉन्ट्रॅक्टर आहे. काही दिवसांपासून प्रमोद आणि बिपीनमध्ये वाद सुरू होता. बिपीन याचा काटा काढण्यासाठी प्रमोदने बिपीनची सुपारी दिली तर सोनूने फक्त 10 हजार देत या हल्ल्यासाठी लहान मुलांचा वापर केला होता. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. आशिष पांडे या सराईत गुन्हेगाराविरोधात पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. (Attack on a contractor in Kalyan over a business dispute)

इतर बातम्या

Nashik News | नाशिकमध्ये दोन अपघातात 1 ठार; 2 गंभीर जखमी, treatment सुरू

Yavatmal Crime | बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, 5 लाख रुपयांचे साहित्य जप्त

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.