Kalyan Crime: वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण, कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक

कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोड येथील सरस्वती सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहनदास नायर यांच्या वीज बिलाची थकबाकी होती. त्यांचे 900 रुपयाचे वीज बिल थकीत आहे. यामुळे या बिलाच्या वसुलीसाठी मोहनदास यांच्या इमारतीमध्ये महावितरणच्या दोन महिला कर्मचारी गेल्या होत्या.

Kalyan Crime: वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण, कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 12:17 AM

कल्याण : महावितरणचे विजेचे थकित बिल वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला एका ग्राहकाने मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. या प्रकरणी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ग्राहकाला अटक केली आहे. मोहनदास नायर असे अटक मारहाणा करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे.

महावितरणकडून वीज बिल वसुली मोहिम

महावितरणने सध्या वीज बिल वसुलीची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत महावितरण ग्राहकांकून थकीत वीज बिल वसुल करण्यात येत आहे. सलग दोन महिने वीजबिल थकबाकी ठेवणाऱ्या ग्राहकावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वीज बिल भरले नसेल तर महावितरणकडून थेट वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेल्या होत्या महिला कर्मचारी

कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोड येथील सरस्वती सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहनदास नायर यांच्या वीज बिलाची थकबाकी होती. त्यांचे 900 रुपयाचे वीज बिल थकीत आहे. यामुळे या बिलाच्या वसुलीसाठी मोहनदास यांच्या इमारतीमध्ये महावितरणच्या दोन महिला कर्मचारी गेल्या होत्या. सविता काटे आणि पल्लवी टोळे अशी या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कर्मचाऱ्यांनी मीटर काढताच मोहनदास संतापले. याच संतापाच्या भरात मोहनदास यांनी त्यांच्या हातातील वीज मीटर खेचून घेत सविता यांना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली.

आरोपी ग्राहकाविरोधात कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी सविता काटे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोहनदास विरोधात तक्रार दाखल केली. सरकारी कर्मचारी आणि महिलेवर हात उगारल्या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मोहनदास विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Beating of a female employee of MSEDCL who went to collect electricity bill)

इतर बातम्या

Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; त्यांच्या नावाने जात पडताळणीच झालीच नाही; आरटीआयमधून उघड

Sangali Crime: माता न तू वैरिणी! सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.