Bhandup Hospital Fire | विद्युत सर्किटला आग लागल्याने भांडुप मॉलमधील दुर्घटना, अग्निशमन दलाच्या अहवालातील महत्त्वाची माहिती
तसेच यात दुकान मालक आणि मॉल प्रशासकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. (Bhandup Dream Mall Sunrise Covid hospital fire fire brigade Inquire Report)
भांडुप : भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला (Bhandup Sunrise Covid hospital fire) गुरुवारी (25 मार्च) आग लागली. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाने बनवलेला अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. त्यानुसार विद्युत सर्किटला आग लागल्याने ही दुर्घटना घडली असे नमूद करण्यात आले आहे. तसेच यात दुकान मालक आणि मॉल प्रशासकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. (Bhandup Dream Mall Sunrise Covid hospital fire fire brigade Inquire Report)
अग्निशमन दलाच्या अहवालातील महत्त्वपूर्ण माहिती
भांडुपच्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निशामक दलाने अहवाल बनवला आहे. हा अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. या अहवालात विद्युत सर्किटला आग लागण्याचे मुख्य कारण असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. ही आग मॉलमधील तळ मजल्यावरील 140 या दुकानात पहिल्यांदा लागली. त्यानंतर इतर मजल्यापर्यंत ही आग पसरली हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
मॉलची अग्निशामक यंत्रणा नव्हती
भांडुपच्या मॉलमध्ये आग लागल्यानंतर मॉलमध्ये बसवण्यात आलेली अग्निशामक यंत्रणा अॅक्टिवेट झाली नाही. त्यामुळे ही आग पसरत गेली. त्यानंतर सर्व मजल्यावर आगीमुळे उष्णता निर्माण झाली. मात्र तेव्हाही कोणताही गजर, स्पिनकलर प्रणाली सक्रिय झाली नाही. त्यामुळे मॉलची अग्निशामक यंत्रणा कार्यरत नव्हती, असे स्पष्ट होत आहे. असे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
दुकान मालक आणि मॉल प्रशासकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष
तसेच या अहवालात नमूद करण्यात आलं की, अग्निशमन दलाला बोलावण्यास विलंब करण्यात आला. सुरुवातीच्या टप्प्यात ही आग लागल्याचे समजले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला माहिती देण्यास उशीर झाला. तसेच नियंत्रण कक्षाला उशिरा माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजवरून ही आग जवळपास 23.15 वाजता आग लागली. तर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला 23.57 वाजता कॉल आला. तसेच या अहवालात दुकान मालक आणि मॉल प्रशासकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष दर्शवण्यात आले आहे.
भांडुपमध्ये 10 जणांचा मृत्यू
सनराईस रुग्णालयात गुरुवारी (25 मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या मॉलला रात्री 12च्या सुमारास आग लागली. आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी 11 तास लागले. आग नियंत्रणात आली असली तरी अधूनमधून आग भडकत असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
61 जणांना बाहेर काढलं
या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयातील 61 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आगीत अडकलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. (Bhandup Dream Mall Sunrise Covid hospital fire fire brigade Inquire Report)
संबंधित बातम्या :
Bhandup mall fire: भांडूपच्या आगीचा पीएमसी बँकेशी संबंध?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…