Ulhasnagar Crime : उल्हासनगरात पोलिसांकडून अट्टल बाईक चोराला बेड्या, बाईक चोरीच्या 11 गुन्ह्यांची उकल

पोलिसांनी आरोपीकडून चोरलेल्या 3 बाईक आणि 2 स्कूटर हस्तगत केल्या आहेत. मलंग शेखवर आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी, मध्यवर्ती, अंबरनाथ, मानपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक या पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत. तर मुंबईच्या काळाचौकी, नागपाडा, जेजे मार्ग आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात एक एक गुन्हा दाखल आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात पोलिसांकडून अट्टल बाईक चोराला बेड्या, बाईक चोरीच्या 11 गुन्ह्यांची उकल
उल्हासनगरात पोलिसांकडून अट्टल बाईक चोराला बेड्या
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:18 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात विठ्ठलवाडी पोलिसांनी अट्टल बाईक चोरा (Bike Thief)ला बेड्या ठोकल्या आहेत. या चोराच्या अटकेने बाईक चोरीच्या 11 गुन्ह्यां (Crime)ची उकल झाली आहे. मलंग सय्यद शेख असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील भरत नगरमध्ये विठ्ठलवाडी पोलीस गस्त घालत असताना त्यांना एक इसम संशयास्पदरित्या आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो अट्टल बाईक चोर असल्याचं समोर आलं. (Bike thief arrested by vitthalwadi police in Ulhasnagar)

आरोपीला न्यायालयाकडून 4 दिवस पोलिस कोठडी

पोलिसांनी आरोपीकडून चोरलेल्या 3 बाईक आणि 2 स्कूटर हस्तगत केल्या आहेत. मलंग शेखवर आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी, मध्यवर्ती, अंबरनाथ, मानपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक या पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत. तर मुंबईच्या काळाचौकी, नागपाडा, जेजे मार्ग आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात एक एक गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलिसांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतून रिक्षा सोलापुरात विकणारी टोळी जेरबंद

मुंबई आणि परिसरातून ऑटो रिक्षा चोरून अक्कलकोट सोलापूर येथे विकणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद आसिफ शेख आणि लक्ष्मीकांत राजू खेत्री अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मालवणी पोलीस ठाण्यात 11 मार्च 2022 रोजी ऑटो रिक्षा चोरीचा एफआयआर नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही टोळी ऑटो रिक्षा चोरून त्यांची नंबर प्लेट बदलून अक्कलकोट सोलापूर येथे विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यात चोरी केलेल्या 14 रिक्षा जप्त केल्या आहेत. सोलापुरात नवीन सीएनजी पेट्रोल पंप सुरू झाला आहे, त्यामुळे ते मुंबईतून सीएनजी ऑटो रिक्षा चोरतात. (Bike thief arrested by vitthalwadi police in Ulhasnagar)

इतर बातम्या

Hingoli | बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य! गुन्हा दाखल, पण आरोपी मोकाटच

प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.