मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचा नगरसेवक आमनेसामने

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी शानु पठाण यांना अडवले. | Kirit Somaiya criticare hospital Mumbra

मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचा नगरसेवक आमनेसामने
किरीट सोमय्या आणि शानू पठाण
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 9:09 AM

ठाणे: मुंब्र्याच्या कौसा परिसरातील प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत (Fire in Hospital) चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अनपेक्षित विरोधाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक शानु पठाण किरीट सोमय्या यांना बघताच आक्रमक झाले. त्यामुळे प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला. (BJP leader Kirit Somaiya and NCP Shanu Pathan verbal battle outside prime criticare hospital Mumbra)

एखादी दुर्घटना घडल्यानंतर राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे ही काही नवीन बाब नाही. त्यानुसार किरीट सोमय्याही बुधवारी सकाळी प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयात पोहोचले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानु पठाण यांनी ‘किरीट सोमय्या वापस जावो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी शानु पठाण यांना अडवले. आम्ही लोकांना वाचवण्याचे काम करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी राजकारण करु नये, असे शानु पठाण यांनी किरीट सोमय्यांना सुनावले. त्यानंतर किरीट सोमय्या काहीवेळातच पाहणी करुन घटनास्थळावरून निघून गेले.

मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत

मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे (Fire in Hosptia) चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये 14 तर अतिदक्षता विभागात (ICU) सहा रुग्णांवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

संबंधित बातम्या:

Thane Hospital Fire: मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत

Bhandup Fire | भांडुप मॉलमध्ये आग, कोव्हिड रुग्णालय आगीच्या विळख्यात

Virar Hospital Fire | विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात भीषण आग, 13 जणांचा मृत्यू

(BJP leader Kirit Somaiya and NCP Shanu Pathan verbal battle outside prime criticare hospital Mumbra)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.