Dombivali Crime : डोंबिवलीत पैशाचा पाऊस पाडतो सांगत बांधकाम व्यावसायिकाची 56 लाखांची फसवणूक, चार आरोपींना अटक
ठाकुर्ली चोळेगाव येथे सुरेंद्र पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दावडी गावात पाटीदार भवन येथे कार्यालय आहे. त्यांना पाच भोंदूबाबाच्या टोळीने 10 टक्के पैसे पूजेसाठी दिले तर 50 कोटीचा पाऊस पाडून देतो असे सांगितले. त्यानुसार 56 लाखाची रक्कम सुरेंद्र यांनी तयार करत केली. या भोंदूबाबाच्या टोळीने शनिवारी रात्री पाटील यांच्या पाटीदार भवन कार्यालयात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू केली.
डोंबिवली : एका बांधकाम व्यावसायिकाला 50 कोटीचा पाऊस पाडून देतो असे आमिष (Lure) दाखवत 5 जणांच्या टोळक्याने त्याची 56 लाखाची फसवणूक (Fraud) केल्याची घटना शनिवारी सकाळी ठाकुर्लीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक (Builder) सुरेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड, महेश आणि रमेश मोकळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सुरेंद्र पाटील असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी चार संशयित आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
पूजेदरम्यान कार्यालयाला प्रदक्षिणा घालण्यास सांगत पैसे घेऊन पळाले
ठाकुर्ली चोळेगाव येथे सुरेंद्र पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दावडी गावात पाटीदार भवन येथे कार्यालय आहे. त्यांना पाच भोंदूबाबाच्या टोळीने 10 टक्के पैसे पूजेसाठी दिले तर 50 कोटीचा पाऊस पाडून देतो असे सांगितले. त्यानुसार 56 लाखाची रक्कम सुरेंद्र यांनी तयार करत केली. या भोंदूबाबाच्या टोळीने शनिवारी रात्री पाटील यांच्या पाटीदार भवन कार्यालयात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू केली. पहाटेच्या सुमारास या टोळीने सुरेंद्रला त्याच्या इमारतीला पाच प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. सुरेंद्रने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. याचा फायदा घेत भोंदूबाबाच्या या टोळीने त्यांच्यासाठी दिलेले 56 लाख घेऊन तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठत अशोक गायकवाड, रमेश मुकणे, संजय भोळे, गणेश, शर्मा गुरुजी नावाच्या पाचही जणांविरोधात तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई करत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. (Builder in Dombivali cheated of Rs 56 lakh by showing the lure of money rain)