VIDEO : उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा मोबाईल खेचून पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद

कॅम्प 5 च्या गांधी रोड परिसरातील रस्त्यावर रात्री एक व्यक्ती मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हाताला हिसका देत मोबाईल चोरी करून धूम ठोकली.

VIDEO : उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा मोबाईल खेचून पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा मोबाईल खेचून पोबारा
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 11:09 PM

उल्हासनगर : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी रस्त्यावरुन चाललेल्या इसमाचा मोबाईल (Mobile) खेचून धूम ठोकल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. मोबाईल चोरीची ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. कॅम्प 5 च्या गांधी रोड परिसरातील रस्त्यावर रात्री एक व्यक्ती मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हाताला हिसका देत मोबाईल चोरी करून धूम ठोकली. दरम्यान या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. (CCTV captures incident of mobile phone theft by thieves on two-wheeler in Ulhasnagar)

नाशिकमध्ये 2 लाखांचे मोबाईल आणि स्मार्ट वॉचची चोरी करणाऱ्याला बेड्या

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवाजी पुतळा येथून कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या एका पिकअपमधून दोन लाख रुपये किंमतीच्या मोबाईलची आणि स्मार्ट वॉचची चोरी करण्यात आली होती. या घटनेचा छडा लावत नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 मार्च रोजी दुपारच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे रोडच्या पुलाखाली रोडवर कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या महिंद्रा पिकप गाडीतून धुळे येथे डिलिव्हरीसाठी ठेवलेले मोबाईल स्मार्ट वॉच असलेले खाकी बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली होती.

याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्याचे ठाण्याकडून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी गुन्हे शाखा पथकातील कर्मचाऱ्याला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित शुभम कोरडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्याकडून दोन लाख 14 हजारांचे मोबाईल स्मार्टवॉच असलेले बॉक्स जप्त केले केले आहे. (CCTV captures incident of mobile phone theft by thieves on two-wheeler in Ulhasnagar)

इतर बातम्या

Bank Fraud : सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना, डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील घटना

आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.