कल्याण-डोंबिवली : एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातला ओमिक्रॉन(Omicron)चा पहिला रुग्ण बरा झालाय. त्याला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तां(kalyan dombivli municipal corporation commissioner)नी ही माहिती दिलीय.
राहावं लागणार क्वारंटाइन
संबंधित रुग्ण ३३ वर्षांचा असून त्याची मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र योग्य उपचार घेतल्यानंतर आता त्याची चाचणी निगेटिव्ह आलीय. रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलंय, अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी (KDMC commissioner Vijay Suryavanshi) यांनी दिलीय. संबंधित रुग्णाला ७ दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे.
ट्रॅव्हल हिस्ट्री
मेकॅनिकल इंजिनिअर असलेला हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंग(Genome Sequencing)साठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ डिसेंबरच्या दरम्यान या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं.
आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
आरोग्यमंत्री राजे टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले, की घाबरण्याचे शून्य टक्केदेखील कारण नाही. या विषाणूचा मृत्यूदर खूप कमी आहे. मात्र त्याचा संसर्गदर जास्त आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या संपर्कात पाच मिनिटेजरी एखादा व्यक्ती आला तर त्यालादेखील ओमिक्रॉनची लागण होते. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.