ठाणे – नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत फराळाचा अस्वाद घेतला. या कार्यक्रमाला ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्यासोबतच इतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. फराळाच्या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन देखील दिले.
पोलिसांच्या कमागिरीचे कौतुक
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट होते, विशेष: महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अधिक गंभीर होती. अशाही परिस्थितीमध्ये पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले, अनेक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला. मात्र तरी देखील ते आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. इतरही वेळेस पोलीस आपले काम करत असतात, सण उत्सव, निवडणुकींच्या काळात त्यांना 12-12 तास काम करावे लागते. त्याचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर येतो मात्र तरी देखील ते कधीही तक्रार करत नाहीत. पोलीस हे जणतेचे रक्षक असतात, पोलिसांमुळे आपण सुरक्षीत आहोत. कोरोनाकाळात पोलिसांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करावे वाटते. परिस्थिती धोकादायक बनली होती, तरीही ते आपले कर्तव्य बजावत होते. कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आला होता, जनतेला घराबाहेर पडण्यास मनाई होती. मात्र तरी देखील काही जण बाहेर पडतच होते, अशा लोकांवर कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ले देखील झाल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, मुख्यमंत्री त्या दृष्ट्रीने पाऊले उचलत असल्याचं शिंदे यांनी म्हटले आहे.
दिवाळीनिमित्त भेटीगाठी, आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शेलार म्हणाले…https://t.co/CIvcNmHLXM#ashishshelar | #rajthackeray | #mumbai | #bjp | #mns
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2021
संबंधित बातम्या
किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच
शरद पवार, काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? नारायण राणेंनी वक्तव्यांचा पाढा वाचला
तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास 2 लाखांचा मोफत लाभ अन् 4 लाखांचा फायदा, पण कसा?