दोन महिन्यांत दीड कोटींची वीजचोरी, महावितरणच्या कारवाईनंतर शहर हादरलं
पथकाकडून झालेल्या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास, तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आली.
कल्याण : उच्चदाब ग्राहकांच्या (Kalyan news) वीजपुरवठ्याच्या तपासणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालय (kalyan mahavitran) एकच्या विशेष पथकाने गेल्या दोन महिन्यांत तब्बल १ कोटी ४३ लाख रुपयांच्या ३८ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यातील २९ उच्चदाब ग्राहकांकडून वीजचोरीच्या देयकांचे १ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोंघाविरुद्ध पोलिसांत (police) गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून जाहीर करण्यात आली आहे.
महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालया अंतर्गत उच्चदाब थ्री फेज ग्राहकांची वीज चोरी रोखण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. कल्याण दोन, वसई आणि पालघर या मंडळ कार्यालयांतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या तपासणीसाठी नियमित कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण मंडळ कार्यालय एकच्या विशेष पथकाने उमेशनगर, हाजीमलंग, गौरीपाडा, नेतीवली, खंबालपाडा, सोनारपाडा, सागाव, रेतीबंदर, पारनाका आदी भागात वीजवापराच्या माहितीचे विश्लेषण आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करण्यात आली, त्यामध्ये अनेकांनी वीज चोरी केल्याचं आढळून आलं आहे.
पथकाकडून झालेल्या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास, तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आली. यातील २९ जणांकडून वीजचोरीच्या देयकाचे १ कोटी १७ लाख रुपये. याशिवाय १२ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल ही केला आहे. तर या प्रकरणी दोंघाविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला असून यापुढेही विशेष पथकांच्या कारवाया नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
वीज चोरीची प्रकरण अधिक वाढली आहेत. त्यामुळे काही महिन्यांनी तपासणीसाठी पथक तयार करण्यात येतं. पथकाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे, त्याचबरोबर दंड सुध्दा वसूल केला आहे. त्यामुळे सध्या चोरीचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु चोरीच प्रमाण अजून कमी व्हावं यासाठी पथकाची निर्मिती केली जाते. जे ग्राहक अरेरावी करीत आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.