AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील मनोरुग्ण कुटुंबियांच्या भेटीसाठी आसुसले; मात्र नातेवाईकांची रुग्णांकडे पाठ

मानसिक आरोग्य ढासळलेल्या रुग्णांसाठी ठाण्यातील मनोरुग्णालय वरदान ठरले आहे. या मनोरुग्णालयात सुमारे 1 हजार 22 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 628 पुरुष तर 394 महिलांचा समावेश आहे.

ठाण्यातील मनोरुग्ण कुटुंबियांच्या भेटीसाठी आसुसले; मात्र नातेवाईकांची रुग्णांकडे पाठ
ठाण्यातील मनोरुग्ण कुटुंबियांच्या भेटीसाठी आसुसले
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 10:51 PM
Share

ठाणे : आई-बाबा, भाऊ-बहिणी कुणीतरी येतील… फराळ आणतील… घरी घेऊन जातील… या आशेने बंद खोलीच्या जाळीतून वाटेकडे नजर लावलेले डोळे… पण दिवाळीही सरली. लक्ष्मीपूजन, पाडवा अन् भाऊबीजही… दिवाळीचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना ठाण्यातील मनोरुग्णालयातील रुग्ण मात्र कुटुंबियांच्या एका भेटीसाठी आसुसलेले आहेत. मग काय डॉक्टर, नर्स, कर्मचारीच या रुग्णांचे नातेवाईक बनले आणि घरच्या फराळाने त्यांचे तोंड गोड केले. इतकेच नव्हे तर रांगोळी, आकाश कंदील लावून संपूर्ण रुग्णालयात घरासारखे उजळले.

निदान दिवाळीला तरी नातेवाईक भेटायला येतील अशी रुग्णांना अपेक्षा

मानसिक आरोग्य ढासळलेल्या रुग्णांसाठी ठाण्यातील मनोरुग्णालय वरदान ठरले आहे. या मनोरुग्णालयात सुमारे 1 हजार 22 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 628 पुरुष तर 394 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 40 हून अधिक रुग्ण हे बरेही झाले आहेत. मात्र एकदा रुग्णालयात दाखल केले की जबाबदारी संपली अशी मानसिकता कुटुंबीयांची झाली असल्याचेच दिसून येत आहे. यातील शेकडो रुग्ण असे आहेत जे वर्षानुवर्षे येथे उपचार घेत आहेत. पण त्यांना भेटायला कुणीच येत नाही. वास्तविक रुग्ण कोणीही असो, कोणत्याही वयोगटातील असो, त्याला खरी गरज असते ती आपल्या कुटुंबीयांची. या रुग्णालयातील रुग्णांपैकी अनेकांना नातेवाईक नाही, मुलं मुली आपल्यासोबत ठेवायला तयार नाही किंवा हा त्रास खूप देतो, अंगावर धावून येतो, अशी कारणे देत वर्षातून एकदा घरी घेऊन जाण्यासही नातेवाईक तयार नसतात. त्यामुळे मनोरुग्णांची चिडचिड होते, खासकरून सणासुदीला. निदान दिवाळीला नातेवाईक भेटायला येतील, घरी घेऊन जातील अशी अपेक्षा या रुग्णांची असते.

नातेवाईकांच्या वाटेकडे मनोरुग्णांचे डोळे

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट मोठे होते. त्यामुळे दिवाळी साधेपणाने साजरी झाली. नातेवाईकांनी एकमेकांच्या गाठीभेटी टाळल्या. यंदाही कोरोनाचे संकट टळले नाही. पण गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्साह मोठा आहे. त्यामुळे यावर्षी तरी आई- बाबा, बहिण, भाऊ, काका, मामा किंवा आपली मुलं मुली कुणीतरी येतीलच या आशेने मनोरुग्ण वाटेकडे नजर लावून बसले होते. काहींचे नातेवाईक आलेही. पण ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच ठरली. त्यामुळे येथील रुग्णांचा हिरमोड झाला. पण तो क्षणीकच ठरला ते रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या मायेच्या उबेमुळे. दिवाळी निमित्त रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण रुग्णालय दिवे, आकाश कंदील, रांगोळीने सजवले होते. येथील कर्मचाऱ्यांनी घरातून खास फराळ करून आणला होता. तो या रुग्णांना खाऊ घातला. त्यामुळे काही काळ का असेना या रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

समाजाच्या मानसिकतेमुळे रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला

समाजामध्ये मानसिक रुग्णांच्या प्रति दुजाभाव, भेदभाव आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका बदलला आहे कि बरे झालेल्या रुग्णांना देखील त्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबातील कोणी, ना कधी त्यांना भेटायला आलेत किंवा त्यांना घरी जाण्यासाठी घ्यायला आलेत, असे 40 हून अधिक बरे झालेले रुग्ण या रुग्णालयात कुटुंबीयांच्या भेटीसाठी आसुसले आहेत. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांच्या घराचे खोटे पत्ते देत रुग्णांना या मनोरुग्णालयात सोडून गेले आहेत. या रुग्णांना सण, उत्सव साजरा करता यावा यासाठी अनेक दानशूर व्यक्ती किंवा सामाजिक संघटना नेहमीच मदत करत असतात. मात्र आपल्या नातेवाईकांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आणि घरी जाण्याच्या आशेवर असलेल्या रुग्णांची नेहमीच चिडचिड होत असते. मात्र रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालय कर्मचारी त्यांची समजूत काढून त्यांची मनधरणी करत असतात. (Expect relatives to visit psychiatrists in Thane Mental hospital)

इतर बातम्या

गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं

महाराष्ट्राला 6 पद्म पुरस्कार प्रदान, रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.