Titwala Fighting : किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घातला, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण आपापसात भांडत होते. भांडणादरम्यान एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला खाली पाडले व दुसऱ्या तरुणाने या तरुणाच्या डोक्यात दगड घातला.

Titwala Fighting : किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घातला, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घातला
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 4:01 PM

टिटवाळा : किरकोळ कारणावरुन काही तरुणांमध्ये हाणामारी (Fighting) झाली असून यात एका तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना कल्याणमधील खडवली परिसरात घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media)वर व्हायरल झाला आहे. या घटनेची टिटवाळा पोलिस (Titwala Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या व्हिडिओच्या आधारे तपास करत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या मारहाणीत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उमेश पाटील असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Fighting among youth over minor dispute in Kalyan, video goes viral on social media)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई

काही दिवसांपूर्वी कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण आपापसात भांडत होते. भांडणादरम्यान एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला खाली पाडले व दुसऱ्या तरुणाने या तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार आली नव्हती. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने या व्हिडिओच्या आधारे टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.

जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु

सदर घटना खडवली नदीच्या परिसरात घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र हे तरुण कोण आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. या घटनेत जखमी तरुण उमेश पाटील हा भिवंडी येथे राहणारा आहे. तो खडवली नदी परिसरात आपला काही मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. या तरुणांनी उमेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका तरुणाने त्याच्या डोक्यात दगड घातला. उमेश पाटील याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. (Fighting among youth over minor dispute in Kalyan, video goes viral on social media)

इतर बातम्या

CCTV | डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार, नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

व्याजाच्या पैशातून वादावादी, कर्जदारांकडून तरुणाची हत्या, पुरावे नसताना पोलिसांनी तिघांना पकडलं

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.