राज्यात H3 N2 चा पहिला रुग्ण ‘या’ जिल्ह्यात दगावला; आरोग्य विभागाची काळजी वाढली

देशातील महत्वाच्या शहरांमधूनही ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य खाते आता सतर्क झाले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचेही रुग्ण संख्या वाढत आहे.

राज्यात H3 N2 चा पहिला रुग्ण 'या' जिल्ह्यात दगावला; आरोग्य विभागाची काळजी वाढली
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:02 AM

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आरोग्य विभागा पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर गेला आहे. कारण काही दिवसांपासून ठाणे जिल्हयात कोरोनाबरोबरच आता नव्याने आलेल्या ‘एच 3 एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर, कोरोना आणि ‘एच 3 एन 2’ अशा दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका 79 वर्षीय वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. नव्याने आलेल्या या विषाणूने ठाण्यात पहिला बळी घेतला असल्याने जिल्हा प्रशासनासह, पालिका आरोग्य विभागाची दाणादाण उडाली आहे.

राज्यात आठवडाभरात कोरोनामुळे मृत्यूंच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ‘एच 3 एन 2’ चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, कोविडमुळे ठाणे ग्रामीण क्षेत्रात एक मृत्यु झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

ठाणे जिल्ह्यात कमी झालेल्या कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत आहे. तर जिल्ह्यात कोरोना सक्रीय रुग्णसंख्या 289 इतकी असून त्यापैकी 187 रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत.यातील केवळ 11 रुग्ण रुग्णालयात दाखल असुन उर्वरीत सर्व होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

देशातील महत्वाच्या शहरांमधूनही ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य खाते आता सतर्क झाले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचेही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आता दिल्लीनंतर मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘एच 3 एन 2’ चा पहिला मृत्यू झाल्याने आता डॉक्टरांनीही सर्वांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  देशातील महत्वाच्या शहरांमधूनही संख्या प्रचंड वाढत असल्याचे दिसून येत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.