केडीएमसीच्या माजी स्थायी समिती सभापतीला तीन दिवसाची पोलीस कोठडी
पीडित महिला ही कल्याणमधील समाजसेविका आहे. काही वर्षांपूर्वी संदीप गायकर यांनी कल्याणमध्ये एका फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या महिलेची संदीप गायकर यांच्याशी ओळख झाली होती.
कल्याण : महिलेला अश्लील पोस्ट पाठवल्या प्रकरणी आणि तिच्यावर हल्ला केल्याप्रकरणी केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक संदीप गायकर यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंध ठेवण्यासाठी महिलेवर दबाव आणला तरीही ती तयार झाली नाही. म्हणून गायकरांनी स्वतः फेक इंस्टाग्राम अकाउंट ओपन करुन तिला अश्लील पोस्ट केली. तसेच ही पोस्ट व्हायरलही केली. एवढेच नाही तर या महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर तिच्यावर हल्ला सुद्धा केल्याचाही आरोप गायकर यांच्यावर आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने महिलेवर हल्ला
पीडित महिला ही कल्याणमधील समाजसेविका आहे. काही वर्षांपूर्वी संदीप गायकर यांनी कल्याणमध्ये एका फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या महिलेची संदीप गायकर यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे नंतर मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संदिप गायकरने महिलेकडे शारिरीक संबंधांची मागणी केली. मात्र महिलेने यास नकार दर्शवताच तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीही महिला गायकरशी संबंध तयार झाली नाही. मग शेवटी गायकरने इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट सुरु केले आणि या अकाऊंटवरुन महिलेला अश्लील मॅसेज पाठवू लागला. या विरोधात महिलेने सप्टेंबरमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर गायकरने महिलेवर हल्लाही केला.
न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी
संदीप गायकरला बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत आज कल्याण कोर्टात हजर केलं असता कल्याण कोर्टाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप गायकर यांनी कल्याण कोर्टात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही गायकरने अर्ज केला. तिथेही अर्ज फेटाळण्यात आला. अखेर गायकर याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं व त्याला अटक झाली. महिलेच्या वकील अॅड. क्रांती रोठे यांनी सांगितलं की, संदीप महिलेवर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. अॅसिड टाकण्याची, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, तसेच स्वतः इंस्टाग्राम फेक अकाउंट बनवून अश्लील पोस्ट करत व्हायरल केलं, त्यामुळे महिलेची बदनामी झाली. इतकेच नाही तर त्याने पीडितेचा मोबाईल हॅक केल्याचा आरोपही करण्यात आलाय. (Former KDMC standing committee chairman remanded in police custody for three days)
इतर बातम्या
Pune crime | घटस्फोटास नकार दिल्याने रागवलेल्या पतीने बुक्कीत पाडला पत्नीचा दात