Kalyan Murder : कल्याणमधील हमालाच्या हत्येप्रकरणी माजी नौसेना अधिकाऱ्याला जन्मठेप, कल्याण न्यायालयाने सुनावली शिक्षा

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्य रेल्वेच्या मुंबई-ते-कसारा या मार्गावरील खडावली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नं. 1 च्या पश्चिमेस फॉब ब्रिजच्या खाली कान्हु बाळू जाधव या हमालाची हत्या झाली होती. आरोपी धनंजयकुमार सकलदिप सिन्हा याने 12 फेब्रुवारी 2018 रोजी दांडक्याने मारून हत्या केली होती.

Kalyan Murder : कल्याणमधील हमालाच्या हत्येप्रकरणी माजी नौसेना अधिकाऱ्याला जन्मठेप, कल्याण न्यायालयाने सुनावली शिक्षा
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:27 PM

कल्याण : खडावली रेल्वे स्थानकावर 4 वर्षापूर्वी झालेल्या हमालाच्या हत्येप्रकरणी माजी नौसेना (Navy) अधिकाऱ्याला कल्याण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. धनंजयकुमार सकलदिपराम सिन्हा असे जन्मठेप (Life Imprisonment) झालेल्या आरोपीचे नाव आहे. या शिक्षेसह 1 हजार रूपये दंड आणि हा दंड न भरल्यास 1 महिना कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. हा खटला कल्याणच्या प्रथम वर्ग 5 वे न्यायालयात गेल्या चार वर्षांपासून सुरू होता. आज या खटल्याचा अंतिम निकाल देण्यात आला. कान्हु जाधव असे हत्या करण्यात आलेल्या हमालाचे नाव आहे. किरकोळ वादाचा राग मनात धरुन आरोपीने जाधव याची हत्या (Murder) केली होती. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलाम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करून धनंजयकुमार याला अटक केली होती.

किरकोळ वादातून हमालाची हत्या केली होती

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्य रेल्वेच्या मुंबई-ते-कसारा या मार्गावरील खडावली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नं. 1 च्या पश्चिमेस फॉब ब्रिजच्या खाली कान्हु बाळू जाधव या हमालाची हत्या झाली होती. आरोपी धनंजयकुमार सकलदिप सिन्हा याने 12 फेब्रुवारी 2018 रोजी दांडक्याने मारून हत्या केली होती. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत धनंजयकुमार सिन्हा याला ताब्यात घेतले होते. याबाबत कल्याण न्यायालयामध्ये गेली चार वर्षापासून सुनावणी सुरू होती. यावर कल्याणच्या प्रथम वर्ग 5 वे न्यायालयायाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, धनंजयकुमार सकलदिप सिन्हा हा 2006 मध्ये भारतीय नौसेनेतून सेवानिवृत्त झाला. त्याच्या घरचे कोणी त्याच्या जवळ नसल्याने तो एकटाच खडवली परिसरात राहत होता. परिसरातील लोक त्याला डी.के. सिन्हा, दाढी आणि मोदी अशा टोपन नावाने त्याला ओळखत होते. तो दिवस-रात्र खडवली परिसरात भटकायचा आणि झोप आली तर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील बाकड्यावर अथवा इतरत्र कोठेही झोपायचा. त्याचा रेल्वेच्या प्रवाशांना त्रास होत असे. त्यामुळे त्याला रेल्वेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उठवून हाकलून लावताना कान्हू जाधव हा त्यांना मदत करत होता. या कारणातून कान्हू जाधव आणि धनंजयकुमार सिन्हा यांच्यात किरकोळ भांडण, शिवीगाळ झाली होती. याचा राग मनात धरून 12 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारच्या सुमारास कान्हु जाधव हा खडवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र.1 च्या पश्चिमेस फॉब ब्रिजच्या खाली रेल्वे डीपीच्या जवळ झोपला होता. त्यावेळी धनंजयकुमार सिन्हा याने काठीने हल्ला करत हमाल कान्हु जाधव याच्या डोक्यात काठीचे फटके मारुन त्याची हत्या केली. (Former navy officer sentenced to life imprisonment by kalyan court in murder case)

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.