Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द केरळ स्टोरीचा असाही एक चाहता ज्याने सुरू केली ही सेवा, कारण त्याला द्यायचा आहे महत्त्वाचा संदेश

या चित्रपटाच्या टीझरचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या समर्थनात भाष्य केले आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला आहे.

द केरळ स्टोरीचा असाही एक चाहता ज्याने सुरू केली ही सेवा, कारण त्याला द्यायचा आहे महत्त्वाचा संदेश
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 2:04 PM

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : द केरळ स्टोरी या चित्रपटावरून सध्या बराच वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. केरळमधल्या मुलींचे बळजबरीने धर्मांतर करून नंतर त्यांना दहशतवादी बनवल्याचा दावा या चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेत्री अदा शर्मासह केरळमधील 32 हजार महिलांचे धर्मांतर करून सीरिया आणि येमेनमध्ये पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, नंतर ही ओळ अन् 32 हजार मुलींचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.

महिलांसाठी मोफत रिक्षासेवा

दुसरीकडे या चित्रपटाच्या टीझरचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या समर्थनात भाष्य केले आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. अशातच डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या महिलांसाठी मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे जाहीर केले आहे. या रिक्षाचालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे .

हे सुद्धा वाचा

टीझर आवडल्याने घेतला निर्णय

गणेश मात्रे असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. हा रिक्षा चालक कल्याणच्या खोणी परिसरात राहतो. या रिक्षा चालकाने द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहायला जाणाऱ्या लोकांना आपण मोफत सेवा पुरवणार असल्याचं सांगितलं. आपला मोबाईल नंबरही त्यांच्या रिक्षावर छापलं आहे. तर मी द केरळ स्टोरीचा टीझर पाहिला. मला तो खूप आवडले. मी ही ऑफर सुरू करण्याचा निर्णय घेतला. कारण अनेक हिंदू महिला या लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत.

मला हिंदू स्त्रियांनी या सापळ्याबद्दल सावध करायचे आहे. मला त्यांना या समस्येची जाणीव करून द्यायची होती. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी मला जाहिरात करायची होती. म्हणूनच मी ही ऑफर कल्याण डोंबिवली परिसरातील महिलांना दिली आहे, असे गणेश मात्रे यांनी सांगितले आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात द केरळ स्टोरी चित्रपटासाठी रिक्षा चालकांची महिलांसाठी खास ऑफर सुरू केली. जोपर्यंत चित्रपटगृहात चित्रपट सुरू आहे तोपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात महिलांना मोफत रिक्षासेवा देण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.