डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआड, ड्रिल मशिनच्या आवाजामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
राहुल मध्य प्रदेशातील सिस्को कंपनीत एटीएममध्ये पैसे भरण्याचे आणि काढण्याचे काम करत होता. मात्र मिळणारा पगार परवडत नसल्याने हे काम सोडून त्याने चोरीचा धंदा स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुलने महराष्ट्रसह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रिक पद्धतीने रोकड चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे.
डोंबिवली : एटीएम मशिन तोडून रोकड चोरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्यात. राहुल चोरडिया असे या चोरट्याचे नाव असून तो मध्य प्रदेशमधील इंदोर येथील रहिवासी आहे. आरोपीने एमकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. इंदोरमधील एका कंपनीबरोबर एटीएम (ATM) मशिनमध्ये पैसे भरण्याचे काढण्याचे काम करत होता. मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग स्विकारल्याचे पोलिसांनी सांगितले. (Highly educated thief arrested for breaking ATM in Dombivali)
गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे चोरीची घटना उघड
मानपाडा पोलिसांचे पथक शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मानपाडा सर्कल परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान एका बँकेच्या एटीएममधून ड्रिल मशिनचा आवाज आला. एटीएमचे शटर बंद असताना आतून ड्रील मशिनचा आवाज आल्याने पोलिसांना संशय आला. सतर्कता दाखवत त्यांनी तात्काळ एटीएमचे शटर ठोठावले. त्याचवेळी आतून मशिनचा आवाज बंद झाला.पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी एटीएमचे शटर उघडले असता आतमध्ये असलेल्या इसमाने पोलिसांना धक्का मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत एटीएम फोडण्यासाठी लागणारे ड्रील मशीन, स्क्रू डायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तू आढळल्या. पोलिसांनी हा इसम एटीएममध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी त्याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शेखर बागडे यांनी सांगितले.
नोकरीतून मिळणारा पगार परवडत नसल्याने चोरीचा मार्ग अवलंबला
राहुल मध्य प्रदेशातील सिस्को कंपनीत एटीएममध्ये पैसे भरण्याचे आणि काढण्याचे काम करत होता. मात्र मिळणारा पगार परवडत नसल्याने हे काम सोडून त्याने चोरीचा धंदा स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुलने महराष्ट्रसह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रिक पद्धतीने रोकड चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. (Highly educated thief arrested for breaking ATM in Dombivali)
इतर बातम्या
Beed Firing : बीडमध्ये हळदी समारंभात नवरदेवाचा मित्रांसह धिंगाणा; उत्साही नवरदेवाचा हवेत गोळीबार
VIDEO : अहमदनगरमध्ये सरफेस कोटिंग ऑइल कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान