Dombivali Crime: डोंबिवलीच्या टाटा नाका परिसरात गाव गुंडांची दहशत; घरांवर हल्ला, गाड्यांचे केले नुकसान
डोंबिवली पूर्व भागातील टाटा नाका परिसरात देशमुख होमजवळील लोकवस्तीत रात्री दोन वाजताच्या सुमारास दहा ते बारा टवाळखोर घुसले. या टवाळखोर तरुणांच्या हाती काठ्या रॉड आणि धारदार शस्त्रे होती. या सर्वांनी रस्तावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि तीन चाकी बाईक रिक्षा यांची तोडफोड करीत काही घरांच्या खिडक्या, दरवाजे तोडले.
डोंबिवली : डोंबिवलीतील टाटा नाका परिसरात गाव गुंडांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यरात्री तीन घरांवर हल्ला करीत 10 ते 12 दुचाकी तीन चाकी गाड्यांचे मोठे नुकसान केले आहे. मानपाडा पोलिसांनी या घटनेनंतर काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.
टाटा नाका परिसरात मध्यरात्री घडली घटना
डोंबिवली पूर्व भागातील टाटा नाका परिसरात देशमुख होमजवळील लोकवस्तीत रात्री दोन वाजताच्या सुमारास दहा ते बारा टवाळखोर घुसले. या टवाळखोर तरुणांच्या हाती काठ्या रॉड आणि धारदार शस्त्रे होती. या सर्वांनी रस्तावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि तीन चाकी बाईक रिक्षा यांची तोडफोड करीत काही घरांच्या खिडक्या, दरवाजे तोडले. रात्रीच्या वेळी एकच गोंधळाची परिस्थिती होती. सर्वाच्या घरांना बाहेरून कडी लावली होती. आतून लोक ओरड होते. महिला आणि मुलांमध्ये घबराहट पसरली होती. या परिसरात राहणाऱ्या हरी चव्हाण या व्यक्तीचा आरोप आहे. त्याच्या कुटुंबातील दोन जणांची हत्या करण्यात आली होती. त्यापैकी काही आरोपींनी मला आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी हा प्रकार केला आहे. परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी कारवाई करीत काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले की, सदर घटनेनंतर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन तरुण मनोज राठोड आणि शैलेश शिलवंत या दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
कल्याणमध्ये व्यापारांचा सहआयुक्तांवर हल्ला
प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या सहआयुक्तांच्या पथकावर व्यापाऱ्यांनी कांदे फेकत आणि शिवीगाळ करीत हल्ला केल्याची घटना आज सकाळी कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. यानंतर कारवाई करणाऱ्या पथकाने तेथून काढता पाय घेतला. (Hooligans attack houses and vehicles in Tata Naka area of Dombivli)
इतर बातम्या
Virar : विरारमध्ये इमारतीच्या गॅलरीत खेळत होती चिमुरडी, खाली वाकून बघताना तोल गेला अन्…!
Pune crime| पुण्यात हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर कर्मचाऱ्याने केलं असं काही की …