AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानवी तस्करीत अडकल्या ५३५ महिला, काय आहेत यामागील कारणं, ठाण्यातील वर्षभराची स्थिती काय?

या झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातून एकूण १७४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये ११६ तक्रारी या वैवाहिक, कौटुंबीक समस्यासंदर्भातील होत्या.

मानवी तस्करीत अडकल्या ५३५ महिला, काय आहेत यामागील कारणं, ठाण्यातील वर्षभराची स्थिती काय?
| Updated on: May 24, 2023 | 2:19 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी, ठाणे : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत. १०९१ आणि ११२ अशा प्रकारचा टोल फ्री नंबर ठेवण्यात आला आहे. हुंडाबळी आणि बालविवाह याचे प्रमाणदेखील वाढले आहे. तसेच माता मृत्यू किंवा बाळाचा मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी ग्रामसभेचा माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी जनसुनावणी घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातील १७४ तक्रारींवर तातडीने समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या तक्रारींवर मंगळवारी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी झाली. यावेळी महिलांवरील कौटुंबीक हिंसाचार, बालविवाह, माता आणि बालमृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. महिलांच्या अशा समस्यांवर सुनावणी करून त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन मंगळवारी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे करण्यात आले होते.

यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अति. पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, ठाणे महापालिका उपायुक्त गोदापुरे आदी उपस्थित होते.

१७४ तक्रारी प्राप्त झाल्या

या झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातून एकूण १७४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये ११६ तक्रारी या वैवाहिक, कौटुंबीक समस्यासंदर्भातील होत्या. तर १८ तक्रारी सामाजिक समस्येच्या, ९ तक्रारी मालमत्ता विषयक, ५ तक्रारी या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या आणि इतर विषयाच्या २६ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या तक्रारींवर पाच पॅनेलच्या माध्यमातून जागेवरच सुनावणी घेण्यात आली. संबंधित विभागांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती चाकणकर यांनी दिली. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

लव्ह जिहादचा संबंध नाही

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत न सापडलेल्या ५३५ महिला आणि मुलींचा 2022 चा आकडा आहे. लव्ह जिहादचा यात काही संबंध नाही. कोविड काळात व्यवसायानिमित्त काही महिलांना घराबाहेर पडावे लागले. नोकरीचे आमिष दाखवले गेले. यामुळे या महिला मानवी तस्करीच्या जाळ्यामध्ये अडकल्या आहेत. महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीत १७४ तक्रारींवर सुनावणी झाल्याचंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.