येथे होत होती बाळांची खरेदी-विक्री, धक्कादायक खुलासे आले समोर

उल्हासनगरात एका महिला डॉक्टरने नवजात बाळांच्या खरेदी विक्रीचा बाजार मांडल्याचं उघड झालंय. नवजात बालकांची लाखो रुपयांना विक्री करताना सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी या डॉक्टरला रंगेहात पकडलं.

येथे होत होती बाळांची खरेदी-विक्री, धक्कादायक खुलासे आले समोर
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 2:52 PM

निनाद करमरकर, प्रतिनिधी, ठाणे : काही दाम्पत्याला बाळ नको असते. अशावेळी डॉक्टरशी ते संपर्क साधतात. पण, ते बाळ झाल्यास त्यांचा कसा फायदा आहे, ते समजावून सांगितलं जातं. नको असलेले बाळ ज्यांना बाळाची गरज आहे, त्यांना विकलं जातं. असा बाळांच्या खरेदी-विक्रीचा गोरखधंदा काही ठिकाणी चालतो. उल्हासनगरात एका महिला डॉक्टरने नवजात बाळांच्या खरेदी विक्रीचा बाजार मांडल्याचं उघड झालंय. नवजात बालकांची लाखो रुपयांना विक्री करताना सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी या डॉक्टरला रंगेहात पकडलं. यामुळं शहरात खळबळ माजली आहे.

नवजात बाळांची खरेदी विक्री

उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील कंवरराम चौक परिसरात डॉक्टर चित्रा चैनानी यांचं महालक्ष्मी नर्सिंग होम आहे. याठिकाणी नवजात बालकांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांची मदत घेत एक बनावट ग्राहक तयार केले.

हे सुद्धा वाचा

२२ दिवसांचे बाळ दाखवले

तिला मुलगा हवा असल्याचं डॉक्टर चित्रा चैनानीला सांगितलं. त्यानुसार या डॉक्टरने नाशिकहून आलेल्या एका महिलेचं २२ दिवसांचं बाळ या महिलेला दाखवलं. सात लाख रुपये किंमत सांगितली. हा सौदा केला जात असतानाच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली.

बाळाच्या आईलाही घेतले ताब्यात

डॉक्टर चैनानी आणि विक्रीसाठी आणलेल्या बाळाच्या आईला ताब्यात घेतलं. ठाणे क्राईम ब्रँच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे झाले. याठिकाणी ज्यांना बाळ नको आहे आणि ज्यांना बाळाची गरज आहे, अशांची गाठभेट करून दिली जाते. मध्यस्त म्हणून डॉक्टर चैनानी काम करत होती.

मुला-मुलीचे रेट वेगवेगळे

तसंच जितक्या लाखात सौदा झाला आहे, त्यापैकी जवळपास अर्धे पैसे डॉक्टरला मिळत होते. मुलाचा आणि मुलीचा रेट वेगवेगळा होता. असे अनेक धक्कादायक खुलासे तिच्या चौकशीतून झाले. या रॅकेटमध्ये महाराष्ट्राबाहेरील सदस्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्या दिशेनं सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.