Vipin Sharma : महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करा : डॉ. विपिन शर्मा

नागसेन नगरमधील पाच ते सहा गल्ल्यांमध्ये टाईल्स बसविणे, शौचालय दुरुस्ती करणे, कामगार वसाहत ते मुख्य रस्त्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, खारटन रोड लगत दोन शौचालयांमध्ये लाईट मिटर बसविणे, पार्किंगकरीता आरक्षित भुखंडाची धोकादायक कंपाऊंड वॉल बांधणे तसेच भूखंडामध्ये नियमितपणे दुरुस्तीचे कामकाज करून 15 मे पर्यंत कार्यशाळा विभागाकडील कार्यालय सदर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Vipin Sharma : महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करा : डॉ. विपिन शर्मा
ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा यांनी दुरुस्तीच्या कामांची पाहणी केलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:01 PM

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Vipin Sharma) यांनी मंगळवारी सकाळी जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती गटर्स कामांची पाहणी (Infections) करून शहरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे, पार्किंग गाड्या तात्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले. शर्मा यांनी मंगळवारी कोर्ट नाका येथून स्वच्छता कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणी दौऱ्यास माजी उप महापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम, अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त शंकर पाटोळे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. (Immediate removal of encroachments on TMC reserved plots, orders of TMC Commissioner)

दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश

पेढ्या मारुती मंदिर ते घड्याळ टॉवरपर्यंत नाला बांधणे, पेढ्या मारुती गणपती मंदिर समोरील नाला स्वच्छ करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे आदेश देतानाच या परिसरात असलेले रिकामे विद्युत खांब निष्कासित करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले. मार्केट परिसरातील भूमिगत ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करणे, सरस्वती अपार्टमेंट ते वैभव ट्रेडिंग रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण करणे, महात्मा फुले मंडई बाहेरील सर्व अतिक्रमणे निष्कासित करुन विहीत कार्यपध्दतीने मंडई अंतर्गत ओट्यांमध्ये पुनर्वसन करणे तसेच नियमित साफसफाई ठेवणे, पंडीत जवाहरलाल नेहरु बाल उद्यानामध्ये किरकोळ दुरुस्ती व लँडस्केपिंग तसेच उद्यानासमोरील पार्किंगचे आरक्षण भूखंड विकसित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिल्या.

नागसेन नगरमधील पाच ते सहा गल्ल्यांमध्ये टाईल्स बसविणे, शौचालय दुरुस्ती करणे, कामगार वसाहत ते मुख्य रस्त्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, खारटन रोड लगत दोन शौचालयांमध्ये लाईट मिटर बसविणे, पार्किंगकरीता आरक्षित भुखंडाची धोकादायक कंपाऊंड वॉल बांधणे तसेच भूखंडामध्ये नियमितपणे दुरुस्तीचे कामकाज करून 15 मे पर्यंत कार्यशाळा विभागाकडील कार्यालय सदर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

अनधिकृत भोगवटादारांविरुध्द विहीत कारवाई करण्याचे आदेश

महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी खारटन रोड परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेली घरे, तळमजला अधिक एक मजली धोकादायक इमारतीमधील 30 भोगवटादार तसेच लफाट चाळीतील 60 अधिकृत भोगवटादारांचे सदर परिसरात सुरु असलेल्या झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत पुनर्वसन करणेकामी आवश्यक उपाययोजना करणे तसेच लफाट चाळीतील उर्वरीत सुमारे 60 अनधिकृत भोगवटादारांविरुध्द विहीत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

इलेक्ट्रीक बसेसच्या बॅटरीबॅकअची प्राथमिक चाचणी सुरु

ठाणा कॉलेज लगत उद्यानाचे आवश्यक लँडस्केपिंग करणे, झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, उद्यानांमध्ये थीम पेंटींग करणे, खारटन रोड परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर तसेच कदम कंपाऊंडमधील आरक्षणे विकसित करणे यासोबतच सिडको बस स्टॉप समोरील नाल्याची भिंत बांधणे व नाल्यावरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिले. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या इलेक्ट्रीक बसेसच्या बॅटरीबॅकअची प्राथमिक चाचणी सुरु असून डॉ.शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत या बसमधून प्रवास केला. (Immediate removal of encroachments on TMC reserved plots, orders of TMC Commissioner)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याणमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला

Ulhasnagar Murder : उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून केलं कृत्य

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.