Kalyan Crime: जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग

कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला एका अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल करुन त्याने अश्लील हावभाव केले. तरुणी एका चांगल्या पेशात आहे. त्या तरुणीने त्वरीत तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतरही या तरुणीला इंटरनॅशनल व्हर्च्युअल मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल सुरु झाले.

Kalyan Crime: जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग
जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 10:16 PM

कल्याण : पाच वर्षापूर्वी तरुणीने जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याच्या रागात इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणाने पाच वर्षानंतर तरुणीला त्रास देण्यासठी इंटरनॅशलन व्हर्च्युअल मोबाईलवरुन तरुणीला व्हिडिओ करुन तिचा सातत्याने तिचा विनयभंग केला. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गुरुदीपसिंग खालसा असे या आरोपीचे नाव असून तो इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो.

व्हिडिओ कॉल करुन अश्लील हावभाव करायचा

कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला एका अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल करुन त्याने अश्लील हावभाव केले. तरुणी एका चांगल्या पेशात आहे. त्या तरुणीने त्वरीत तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतरही या तरुणीला इंटरनॅशनल व्हर्च्युअल मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल सुरु झाले. यामुळे तरुणी हैराण झाली. अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली. महात्मा फुलेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. इंटरनॅशनल व्हर्च्युअल मोबाईलवरुन व्हिडिओ कॉल होत असल्याने तो नंबर ट्रेस करणे अतिशय कठिण होते.

सायबर सेल आणि तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीला पडकले

ठाणे सायबर सेल आणि तांत्रिक विश्लेषक यांच्या मदतीने तांत्रिक बाबींवर तपास केला गेला. आरोपीने एअरटेल आणि डेलिक्सनेट सोल्यूशन कंपनीचे आयपी अॅड्रेस वापरल्याचे दिसून आले. सदर कंपनीकडून प्राप्त झालेल्या दोन संशयित मोबाईल नंबरचा तपास सुरु केला. उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये राहणारा गुरदीप खालसा या 27 वर्षीय तरुणाने हा आयपी अॅड्रेस वापरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी खालसाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली. पोलीस चौकशीत आपण गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले. गुरुदीपसिंग हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. पाच वर्षापूर्वी पिडीत तरुणीने गुरुदीपसोबत एक जाहिरातीचा व्हिडिओ तयार करण्यास नकार दिला होता. त्याचा राग काढण्यासाठी गुरुदीपसिंगने तिच्यासोबत हे कृत्य केले. गुरुदीपने अन्य कोणाशी असा प्रकार केला आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. (In Ulhasnagar, a young woman was molested by making a pornographic video call)

इतर बातम्या

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांचा कार्यकाळ आज संपुष्टात, मात्र अद्याप झोनल डायरेक्टर या पदावर कायम

Kalyan Crime: पती-पत्नीने मित्रांच्या मदतीने रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुटले, सीसीटीव्हीच्या सहाय्याने लागला गुन्ह्याचा छडा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...