CCTV Video : सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून कल्याणमध्ये दुकानावर डल्ला, सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एका मिठाईच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील पैसे व मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली होती. हे दोघे सराईत चोरटे होते दुकानात सीसीटीव्ही असल्याचे माहिती पडताच दोघांमधील एकाने स्टूलवर चढत सीसीटीव्ही फिरवले. मात्र या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन चोरटे कैद झाले होते.

CCTV Video : सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून कल्याणमध्ये दुकानावर डल्ला, सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून कल्याणमध्ये दुकानावर डल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 4:26 PM

कल्याण : बंद दुकानांचे शटर उचकटून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) फिरवत मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक (Arrest) करण्यात महात्मा फुले पोलिसां (Mahatma Phule Police)ना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. मोहंमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान असं या चोरट्याचं नाव असून तो उल्हासनगर येथील राहणारा आहे. कल्याण परिसरात बंद दुकानांचे शटर उचकटून दुकानात चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण महात्मा फुले पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते. अखेर उल्हासनगरमधील खेमानी परिसरात सापळा रचत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अटक

एका मिठाईच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील पैसे व मुद्देमाल चोरी झाल्याची घटना घडली होती. हे दोघे सराईत चोरटे होते दुकानात सीसीटीव्ही असल्याचे माहिती पडताच दोघांमधील एकाने स्टूलवर चढत सीसीटीव्ही फिरवले. मात्र या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन चोरटे कैद झाले होते. हे सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. चोरट्याचं नाव मोहंमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान असून त्याचा एक अल्पवयीन साथीदार आहे. हे दोघे उल्हासनगर खेमानी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उल्हासनगर खेमाणी परिसरात सापळा रचत मोहम्मदला अटक केली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे. (In Kalyan an accused was arrested for turning up a CCTV camera and stealing from a shop)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.