Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा एकदा हत्यार तस्कराकडून गोळीबार, हत्यार विक्रीसाठी आला होता आरोपी
कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात एक व्यक्ती काही हत्यारं विकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांना याची माहिती देण्यात आली. सिनिअर पीआय नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सुनिल पवार, राजेंद्र अहिरे यांची दोन पथके तयार करण्यात आली.
कल्याण : विक्रीसाठी आणलेल्या पिस्तुलमधून जमिनीवर दोन राऊंड गोळीबार (Firing) केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. सूरज शुक्ला (Suraj Shukla) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून दोन पिस्तुल, दोन मॅगझीन आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे. सूरज हा मूळचा मध्य प्रदेशातील भिंड येथील असून कल्याणमध्ये पिस्तूल विकण्यासाठी आला होता. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पिस्तूल विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. त्याने सुद्धा हवेत गोळीबार केला होता. कल्याणमध्ये काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कल्याण हा हत्यारे विक्री करणाऱ्या तस्करांचा अड्डा झालाय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (In Kalyan, once again, the accused had come to sell firearms from the arms smugglers)
पोलिसांपासून सुटका करण्यासाठी आरोपीकडून गोळीबार
कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात एक व्यक्ती काही हत्यारं विकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांना याची माहिती देण्यात आली. सिनिअर पीआय नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सुनिल पवार, राजेंद्र अहिरे यांची दोन पथके तयार करण्यात आली. पहाटे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी लाल चौकी परिसरात आला. पोलिस आधीच या ठिकाणी सापळा लावून बसले होते. आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच त्याने लगेच फूटपाथवर दोन राऊंड फायर केले. फायरिंगमुळे तो पळून जाण्यात यशस्वी होईल, असे त्याला वाटले होते. त्याचा हा प्रयत्न फसला. पोलिस त्याच्या दिशेने धावले. त्याला चारही बाजूने घेरत पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, दोन मॅगझीन आणि 16 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली.
कल्याणमधील ही दुसरी घटना
सूरज कोणाला पिस्तूल विकण्यासाठी आला होता, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कल्याणच्या काळा तलाव परिसरात काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे एका पिस्तूल विक्री आलेल्या आरोपी गणोश राजवंशी याने हवेत गोळीबार केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारे कोण खरेदी करतोय, याबाबत तपास सुरु आहे. अशा घटनांमध्ये पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद असली तरी गुन्हेगारांचीही हिंमत वाढली आहे, हे ही तितकेच खरे आहे. (In Kalyan, once again, the accused had come to sell firearms from the arms smugglers)
इतर बातम्या
Ahmednagar Crime : तब्बल 11 वर्षांनी खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक, अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई
Raj Thackarey : जळगाव न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता