Thane hospital death | ‘माझा भाऊ तक्रार करुन मला मिळणार नाही, पण…’, ऋता आव्हाड यांना ती बहिण काय म्हणाली?

Thane hospital death | "त्यादिवशी एक मुलीला पोलिओ इंजेक्शन दिलं, त्याची रिएक्शन झाली. पायातून सलायन दिल होतं, ते काढताना इन्फेक्शन झालं. स्टाफ ट्रेन नाहीय का? वशिल्याच्या नेमणूका आहेत का?"

Thane hospital death | 'माझा भाऊ तक्रार करुन मला मिळणार नाही, पण...', ऋता आव्हाड यांना ती बहिण काय म्हणाली?
kalwa chhatrapati shivaji maharaj hospital 17 Death
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 1:34 PM

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये हे हॉस्पिटल आहे. दोन दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला याचा जाब विचारला होता. आता पुन्हा एकदा त्याच रुग्णालयात अशी घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालयातील उपचारांचा दर्जा, साधन सामुग्री आणि कुशल मनुष्यबळाचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. प्रशासनावर कठोर टीका केली.

‘तर मी लढले असते’

या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या निनाद लोकूर यांचा कालरात्री मृत्यू झाला. त्याच्या भगिनी कल्याणहून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. “मी सख्ख्या भावाला डेंग्यु झाला होता. त्याला इंटर्नल ब्लिडिंग सुरु होतं. तो जाणार की, नाही जाणार? हे मला माहित नव्हतं. पण त्याची कंडीशन क्रिटिकल होती. माझा काही आरोप नाही. पण तासाभरात 14 रुग्ण गेलेत. तक्रार करुन मला माझा भाऊ परत मिळणार नाही. तो मिळणार असता, तर मी लढले असते. तासाभरात 14 रुग्ण गेले, त्याकडे लक्ष द्याव” असं ती भगिनी म्हणाली.

कोणाला कोणाच्या आयुष्याशी खेळायचता अधिकार दिला आहे का?

आधी मूळात प्रशासन आहे का ? असा सवाल ऋता आव्हाड यांनी केला. “जर का प्रशासनाला काही प्रशासनिक, हॉस्पिटलला समस्या असतील, तर तो पॉलिसी मॅटर आहे. दरवेळेला पेशंट आले, आम्ही फोन केला की, डॉक्टर नाही, स्टाफ नाही आम्ही काय करु? बेड नाही, अशी कारण सांगितली जातात. अन्यथा हॉस्पिटलला टाळं लावा. कोणाला कोणाच्या आयुष्याशी खेळायचता अधिकार दिला आहे का? ज्यांना खासगी उपचार परवडत नाही असे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येतात” असं ऋता आव्हाड म्हणाल्या. वशिल्याच्या नेमणूका आहेत का?

“त्यादिवशी एक मुलीला पोलिओ इंजेक्शन दिलं, त्याची रिएक्शन झाली. पायातून सलायन दिल होतं, ते काढताना इन्फेक्शन झालं. स्टाफ ट्रेन नाहीय का? वशिल्याच्या नेमणूका आहेत का? जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल ऋता आव्हाड यांनी विचारला.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.