अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं मनोमिलन? ‘त्या’ घटनेवरुन ठाण्यात चर्चा रंगली

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मनोमिलन झालं का? अशी चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. या चर्चा रंगण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या कृतीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आभार मानले आहेत.

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं मनोमिलन? 'त्या' घटनेवरुन ठाण्यात चर्चा रंगली
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 10:32 PM

ठाणे | 9 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षातून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षात उभी फूट पडलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे सातत्याने अजित पवार गटावर टीका करत आहेत. तसेच अजित पवार यांच्याकडूनही तसंच उत्तर दिलं जात होतं. या दरम्यान शरद पवार गटातील काही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती.

अर्थात अजित पवार यांची भेट घेणाऱ्या आमदारांमध्ये जितेंद्र आव्हाड नाहीत. ते शरद पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यापासून जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गट यांच्यातील संबंध ताणले गेल्याचं चित्र आहे. असं असताना आज वेगळ्या घडामोडी बघायल्या मिळाल्या. या घडामोडींनंतर आता अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं मनोमिलन झालं का? अशी चर्चा आता रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

अजित पवार गटाचा ठाण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करणे टाळले. पत्रकारांनी अजित पवारांना जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी याआधी जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलताना ‘ठाण्याचा पठ्या’ अशी टीका केली होती. पण त्यांनी आज जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करणे टाळले आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं दोन शब्दांचं ट्विट

विशेष म्हणजे अजित पवार यांनी टीका केली नाही म्हणून लगेच जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर दोन शब्दांची प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवार यांचे आभार मानले. दादा आभार, या दोन शब्दांची जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी अजित दादा यांच्या मनात मी आहे. त्यांनी माझं नाव न घेता टीका करणं टाळलं त्याबद्दल आभारी आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्रे आव्हाड यांनी दिली.

कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.