Thane Theft : गाडीच्या काचा फोडून कारटेप चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या, कळवा पोलिसांकडून चार गुन्ह्यांची केली उकल

ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्याच्या कारटेप चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही लागला.

Thane Theft : गाडीच्या काचा फोडून कारटेप चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या, कळवा पोलिसांकडून चार गुन्ह्यांची केली उकल
गाडीच्या काचा फोडून कारटेप चोरणाऱ्या चोरट्याला बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 5:22 PM

ठाणे : ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये गाडीची काच फोडून कारमधील टेप चोरी (Theft Tape) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. या अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचा चोरी करतानाचा सीसीटीव्ही (CCTV) पोलिसांच्या हाती लागला. तब्बल 40 सीसीटीव्हीचा माघोवा घेत कळवा पोलिसांनी मुंब्रा येथून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत. जुबेर अहमद रईस अहमद (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून पोलिसांना 1 लाख 69 हजार रुपये किमतीचे तब्बल 20 हून अधिक कारटेप हस्तगत केले आहेत.

या प्रकरणी जुबेरचा एक साथीदार हा अद्याप फरार असून, त्याचा शोध कळवा पोलीस घेत आहेत. याआधी त्याने आणखी कुठे अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत ? त्याचे आणखी किती साथीदार आहेत ? त्याच्या चोरी केलेले कारटेप तो कुठे विकतो ? याचा तपास कळवा पोलीस करत असल्याची माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.

आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल

ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्याच्या कारटेप चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही लागला. या सीसीटीव्हीमध्ये दोन तरुण दुचाकीच्या सहाय्याने येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची काच फोडून त्याच्या आतील कारटेप चोरी करताना आढळून आले. या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तब्बल 40 सीसीटीव्हीचा माघोवा घेत मुंब्य्राच्या नारायण नगर येथून गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात यश आले. या आरोपीकडून पोलिसांनी कळवा, वर्तकनगर, ठाणे नगर सारख्या इतर अशा एकूण 4 गुन्ह्यांची उकल केली आहे. या गुन्हेगाराला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. आरोपीने याआधी मुंबई, पणजी, गोवा अशा ठिकाणी देखील असेच गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. (Kalwa police arrested the thief who broke the car window and stole car tape)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.