AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या चोरटीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रायगडमध्ये राहणारी दुर्गा ब्राह्मणो (35) वर्षीय महिला गुरुवारी दुपारी सीएसटी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत होती. कल्याण स्थानकात गाडी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या पर्समधील एक छोटी पर्स गायब आहे. ज्या पर्समध्ये रोकड आणि महत्वाची कागदपत्रे होती. ती गहाळ झाली. दुर्गा यांनी त्वरीत फलाटावर असलेल्या महिला पोलिसाला सांगितले.

Kalyan Crime : लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या चोरटीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या चोरटीला पोलिसांनी ठोकल्या बेड्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 6:53 PM
Share

कल्याण : धावत्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला डब्यात चोरी (Theft) करणाऱ्या एका सराईत चोरी करणाऱ्या महिलेला कल्याण जीआरपीने अटक (Arrest) केली आहे. तान्हाबाई पवार असे या महिलेचे नाव असून हिने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत. तान्हाबाई पवार ही सराईत गुन्हेगार आहे. त्याअनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस अधिकारी अर्चना दुसाने यांनी दिली आहे. गर्दीचा फायदा घेत रेल्वे आणि रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. (Kalyan GRP arrested a woman thief for stealing a local train)

एका चोरी प्रकरणी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर चोरीच्या घटना उघड

रायगडमध्ये राहणारी दुर्गा ब्राह्मणो (35) वर्षीय महिला गुरुवारी दुपारी सीएसटी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत होती. कल्याण स्थानकात गाडी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या पर्समधील एक छोटी पर्स गायब आहे. ज्या पर्समध्ये रोकड आणि महत्वाची कागदपत्रे होती. ती गहाळ झाली. दुर्गा यांनी त्वरीत फलाटावर असलेल्या महिला पोलिसाला सांगितले. महिला पोलिसाने लोकल डब्यात चढून तपासणी सुरु केली. याच दरम्यान एक संशयित महिला त्याच डब्यात दिसून आली. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या महिलेची झाडाझडती घेतली असता तिच्याकडे दुर्गा हिची गायब झालेली पर्स मिळून आली. लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत तिने अनेक चोरीच्या घटना केल्या आहेत. तान्हाबाई कल्याण जीआरपी अंतर्गत अशा किती चोरीच्या घटना केल्या आहेत. (Kalyan GRP arrested a woman thief for stealing a local train)

इतर बातम्या

VIDEO : उन्हाळा, उष्णता अन् भारनियमन; संतप्त नगरसेवकाकडून वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

Sangli Crime : सांगलीत पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.