Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16 लाखांचा दंड वसूल, 167 टीसींची कारवाई

कल्याण रेल्वे स्टेशनवर टीसींनी विशेष तपासणी मोहीम राबवली. 167 टीसींनी स्टेशनवर साखळी तयार करत फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी केली. हजारो फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Kalyan News : तुम हमसे फिर से छुप रहे हो,और.. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16 लाखांचा दंड वसूल, 167 टीसींची कारवाई
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 3:19 PM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 17 ऑक्टोबर 2023 : रेल्वेतून प्रवास करताना अनेक जण तिकीट न काढताच, फुकट (without ticket) प्रवास करत असतात. बरेच वेळा टीसींकडून पकडले गेले तरी, दंड भरावा लागला तरीही ते धडा शिकत नाहीत आणि फुकट प्रवास सुरूच ठेवतात. नागरिकांची लाईफलाइन असलेल्या मुंबई रेल्वेतूनही (सहवोग तदमोत)  अनेक जण फुकट प्रवास करतात. सध्या फुकट्या प्रवाशांची संख्याही खूप वाढली आहे. हेच लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

कल्याण स्टेशनवर दीडशेहून अधिक टीसींनी ( तिकीट तपासनीस)  (TC) फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी केली. दिवसभरात ४ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना रोखून त्यांच्यावर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. त्या दंडाची एकूण रक्कम सुमारे 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

“तुम हमसे फिर से छुप रहे हो… और हम तुम्हारा स्टेशन पे फिर से इंतजार कर रहे हैं!”

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची, तिकीट न काढताच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे रेल्वे विभागाची डोकेदुखी वाढली आहे. लोकलमधील फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत अनेक जण विना तिकीट प्रवास करण्यात यशस्वी होत असल्याने त्यांची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वेने ही मोहीम उघडली होती.

सोमवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत तब्बल 167 टीसींनी साखळी करत कल्याण स्टेशनवर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत टीसींनी फुकट्या प्रवाशांची नाकेबंदी केली. दिनसभरात टीसींनी तब्बल 4438 अशा प्रवाशांना रोखले, ज्यांनी तिकीट काढलं नव्हतं म्हणजेच ते फुकट प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांकडून जो दंड वसून करण्यात आला तो होता तब्बल 16.85 लाख रुपये. कल्याण स्टेशनवर झालेल्या मोहिमेच्या धर्तीवर आता रेल्वेच्या इतर स्टेशनवरही अचानकपणे मोठ्या संख्येने टीसी तैनात करून तिकीट तपास मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.

कल्याण स्थानक – 16.85 lakh penalty imposed in a single day on 4438 ticketless passengers.

  • From 7.00 to 23.00 Hrs
  • Total TTE deputed- 167
  • Total RPF staff deputed- 35
  • Total ticketless passengers caught- 4438
  • Total penalty imposed on them- 16.85 lakhs
  • Average number of passengers caught by one TTE- 27
  • Average penalty imposed by a TTE- 10095/-
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.