AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan ST : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या कल्याण एसटी हाऊसफुल; आतापर्यंत पावणे चारशे बसेस बुक

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळ ही सज्ज झाले आहे. तर दुसरीकडे चाकरमानी कोकणी माणसाला कोकणात एसटी बसने मोफत जाता यावे यासाठी राजकीय पक्षांसह विविध संस्थाही सज्ज झाल्या आहेत.

Kalyan ST : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या कल्याण एसटी हाऊसफुल; आतापर्यंत पावणे चारशे बसेस बुक
एसटी बसImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 5:07 PM

कल्याण : मागील वर्षी कोरोनामुळे गौरी गणपती उत्सवासाठी चारकमान्यांना कोकणात जाण्यास मिळाले नव्हते. परंतु यंदा मात्र गणेशोत्सवा (Ganeshotsav)निमित्त कोकणात जाण्यासाठी कल्याण एसटी डेपोमध्ये रेकॉड ब्रेक बुकिंग (Booking) झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी कल्याण एसटी आगारा (Kalyan St Depot)तून तब्बल पावणे चारशे बसेची बुकिंग झाली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी तसेच प्रवाशांनी देखील बसेस बुकिंग केलं असून अजूनही बुकिंग सुरू असल्याची माहिती कल्याण आगार व्यवस्थापनाने दिली.

यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह

गेल्या दोन वर्षापासून राजकीय अनास्था, कोविड संकट आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्राच्या लालपरीचे विघ्न दूर करण्यासाठी अखेर विघ्नहर्ता धावून आल्याचे दिसत आहे. यंदा गणेशोत्सव देखील निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने गणेशेभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने यंदा नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई व आसपासच्या परिसरात स्थायिक असलेल्या कोकणवासीयांची पावले कोकणाकडे गावी वळत आहेत. चाकरमानी एसटी बसला प्राधान्य देत एक महिना अगोदरपासूनच एसटी बस बुक करण्यास सुरुवात केली आहे.

चाकरमान्यांना मोफत बससेवा देण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संस्थाही सज्ज

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळ ही सज्ज झाले आहे. तर दुसरीकडे चाकरमानी कोकणी माणसाला कोकणात एसटी बसने मोफत जाता यावे यासाठी राजकीय पक्षांसह विविध संस्थाही सज्ज झाल्या आहेत. आपल्या परिसरातील कोकणी बांधवांना बसची सोय मिळण्यासाठी कल्याण एसटी डेपोत मोठ्या प्रमाणात गाड्यांचे बुकिंग केले आहे. एकंदरीत गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी कल्याण एसटी बस डेपोत तब्बल साडेचारशे पेक्षा अधिक बस बुक झाल्या असून, अजूनही हे बुकिंग सुरू असल्याने यंदा कल्याण एसटी महामंडळाने ठाणे विठ्ठलवाडी व आसपासच्या डेपोमधील अधिक बस मागवण्यास सुरुवात केली आहे. तर यावेळी झालेल्या बुकिंग पाहता यंदा एसटी महामंडळला कोट्यवधींचे उत्पन्न अपेक्षित आहे. (Kalyan ST house full going to Konkan in the wake of Ganeshotsav)

हे सुद्धा वाचा

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.