ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर, केदार दिघे यांची टीका

ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट केला आहे.

ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर, केदार दिघे यांची टीका
ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 12:01 AM

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट केला आहे. केदार दिघे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. “तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला”, असं केदार दिघे म्हणाले आहेत. केदार दिघे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

केदार दिघे यांच्या टिकेनंतर आम्ही शिंदे गटाकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तोंडी प्रतिक्रिया दिली. एक ढोल पथक आंनंद आश्रमात आलं होतं. यावेळी संबंधित प्रकार घडला. विशेष म्हणजे गणेशोत्सवात संबंधित ढोल पथक आनंद मठात येणं ही मोठी परंपरा असल्याचं सांगण्यात आलं. ही परंपरा 1980 पासूनची असल्याची त्यांच्याकडून देण्यात आली. आनंद दिघे हयात असतानादेखील संबंधित ढोल पथक आनंद मठात येत असे आणि जल्लोष होत असायचा. तिच प्रथा आताही सुरु आहे, अशी तोंडी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.

शिवसेनेला विधानसभेला फटका बसणार?

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका आगामी काळात बसू शकतो. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. विशेष म्हणजे आनंद मठ हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. असं असताना आनंद मठात नोटा उडवल्याचा प्रकार समोर आल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. शिवसेनेकडून अधिकृतपणे काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.