लायटरच्या जीवावर चोर मांगे More! लायटरसारखी बंदूक ताणून लुटमार करणाऱ्यांना कल्याणमध्ये अटक

कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी कल्याण पश्चिमेतील शहाड परिसरात ड्युटीवर असताना एक संशयित रिक्षा त्यांना जाताना दिसली. पोलिस गाडी तपास होते. या दरम्यान ही रिक्षा दिसल्याने पोलिसांनी हाक मारुन त्या रिक्षाला थांबविण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकाने रिक्षा थांबविली, मात्र रिक्षामधून उड्या टाकून दोन जण पळून गेले.

लायटरच्या जीवावर चोर मांगे More! लायटरसारखी बंदूक ताणून लुटमार करणाऱ्यांना कल्याणमध्ये अटक
लायटरसारखी बंदूक ताणून लुटमार करणाऱ्यांना कल्याणमध्ये अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 8:55 PM

कल्याण : लूटपाट किंवा घातपातच्या तयारीत असलेल्या चार पैकी दोन सराईत गुन्हेगारां (Criminals)ना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी पाठलाग करीत बेड्या ठोकल्या आहेत. दगोस सादिक शेख आणि मुसब शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे या दोघांकडे दोन कोयते आणि एक लायटर सापडला आहे. हा लायटर (Lighter) पिस्तूल सारखा दिसतो. घाबरविण्यासाठी याचा वापर केला जात होता. नक्की हे लोक काय करण्यासाठी चालले होते याचा तपास आताता पोलिस करीत आहेत. (Khadakpada police arrested the criminals who were preparing for the robbery)

पोलिसांनी संशयित रिक्षाची तपासणी करताना कोयते, बंदुक सापडले

कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी कल्याण पश्चिमेतील शहाड परिसरात ड्युटीवर असताना एक संशयित रिक्षा त्यांना जाताना दिसली. पोलिस गाडी तपास होते. या दरम्यान ही रिक्षा दिसल्याने पोलिसांनी हाक मारुन त्या रिक्षाला थांबविण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकाने रिक्षा थांबविली, मात्र रिक्षामधून उड्या टाकून दोन जण पळून गेले. बाकी दोन जणांना दोन पोलिसांनी पकडले. रिक्षाची तपासणी केली असता रिक्षात दोन कोयते आणि एक बंदुक सापडली. ही बंदुक नसून सिगरेट जाळण्याचा लायटर होता. तो चक्क पिस्तूल सारखा दिसत होता. याचा वापर लोकांना घाबरविण्यासाठी केला जात होता.

आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी

पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दगोस सादिक शेख आणि मुसब शेख या दोघांना अटक केली. मुसब हा बाजारपेठ पोलिस ठाण्यातून तडीपार आहे. या प्रकरणाचा तपास अनिल पोवार करीत आहेत. या दोघांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. नक्की हे दोघे काय करण्यासाठी चालले होते. त्याचे पळून गेलेले साथीदार कोण आहेत? लूटपाट किंवा घातपात करणार होते का ? बंदुकीसारखा दिसणारा लायटरचा वापर कशासाठी केला जात होता ? याचा तपास आता सुरु असल्याची माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली आहे. (Khadakpada police arrested the criminals who were preparing for the robbery)

इतर बातम्या

Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

Sangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.