Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव

बिटकॉईन मध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने, घरी बायकोला काय सांगायचे याच विचाराने त्याने आपली दहा लाखाची रोखड चोरटयाने चोरुन नेल्याचा बनाव आखला, असा पोलीस तपासात उलगडा झाला आहे.

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव
वसईतील व्यापाऱ्याचा बनाव
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 10:27 AM

वसई : कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याची लालसा काही क्षणात कशी उद्ध्वस्त करते, याचे एक उदाहरण मुंबईजवळच्या वसई भागात उघड झाले आहे. मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली, त्यात तोटा झाल्यामुळे बायकोला आता काय उत्तर द्यायचे, या विचारातून विरारच्या एका व्यापाराने चक्क दहा लाख रुपयांच्या लुटीचाच बनाव आखला. मात्र त्याचा हा बनाव वसईच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात उघड करत त्याचा पूर्णपणे भांडाफोड केला आहे. पोलिसांनी त्या व्यापाऱ्याचा हा बनाव स्टेशन डायरीमध्ये नोंद केला, तर त्याला समज देऊन सोडून देण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

वसईच्या पापडी येथील साई सर्व्हिस सेंटरसमोर 10 लाख रुपयांची रोकड घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला असल्याची तक्रार विरारच्या सुभंत यशवंत लिंगायत या व्यापाऱ्याने काल दुपारी एक वाजताच्या सुमारास वसई पोलिस ठाण्यात केली होती. जबरी चोरीची घटना असल्याने, वरिष्ठ पोलीस अधिकारी वसई पोलिसांनी घटनास्थळाचा संपूर्ण पंचनामा करून, तपास केला असता ही जबरी चोरी नसून, व्यापाऱ्याचा हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

नेमकं काय घडलं?

8 डिसेंबर रोजी सुभंत लिंगायत यांच्या मुलीचं लग्न आहे. त्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये जमा केले होते. मात्र अधिक पैशांच्या हव्यासातून त्यांनी हे दहा लाख बिटकॉईनमध्ये गुंतंवणूक केले. बिटकॉईन मध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने, घरी बायकोला काय सांगायचे याच विचाराने त्याने आपली दहा लाखाची रोखड चोरटयाने चोरुन नेल्याचा बनाव आखण्याची त्याने युक्ती आखली असल्याचे शेवटी पोलीस तपासात कबुली दिल्याने सर्व प्रकाराचा उलगडा झाला आहे.

काय होता बनाव?

सुभंत यशवंत लिंगायत हा विरार मधील होलसेल व्यापारी आहे. सुभंत याने बनाव आखला की, 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास वसईच्या साई सर्व्हिस येथे रिक्षा थांबवून, रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात एका अज्ञात बाईकस्वाराने हातातील दहा लाखाची रोकड घेऊन, फरार झाला. दहा लाखाच्या रक्कमेतील सव्वा लाख मारुती सुझुकीची गाडी घेण्यासाठी आगाऊ रक्कम देण्यासाठी गेलेलो. त्यानंतर बोरीवली येथे काही व्यापाऱ्यांना रक्कम द्यायची होती, असा बनाव त्याने आखला होता. मात्र पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही अशी घटना घडल्यासंदर्भातचे पुरावे आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केल्यावर व्यापाऱ्याने आपण बनाव आखल्याचा मान्य केलं.

संबंधित बातम्या :

मुंबईत अभिनेत्याची पत्नी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत, बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी उकळले

महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.