“ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत”; मनसे का झाली आहे आक्रमक…

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत; मनसे का झाली आहे आक्रमक...
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 7:00 PM

मीरा-भाईंदर : सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असल्याने वेगवेगळ्या मुद्यांवर जोरदार चर्चा सुरु आहे. कधी विकासाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघत असतं तर कधी युती-आघाडीवरून राजकारण तापलेले असते. सध्या मीरा-भाईंदरचेही वातावरण प्रचंड तापले आहे. कारण कधी काळी मनसेकडून एकनाथ शिंदे यांच्याविषयी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने त्यांच्याविषयी च्रचा करण्यात आली होती. तर आता त्याच मनसेकडून शिंदे सरकारच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये अनेक गुन्हे घडूनसुद्धा पालकमंत्री व प्रशासन झोपले आहे का हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे असा सवाल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सरकारला करण्यात आला आहे. त्यामुळे आता मीरा-भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावर नागरिक नाराज असल्याचे म्हणत पालकमंत्र्यांचे याकडे का लक्ष नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मीरी-भाईंदर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्याकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले आहे असा सवाल करत वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण सरकारच्या लक्षात येत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे तसेच आपण यांना पाहिलात का असाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

पालक मंत्री शंभूराज देसाई मीरा भाईंदर शहरात येत नसल्याने मनसे सैनिकांमध्ये नाराजगी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मीरा भाईंदरकडे दुर्लक्षे केले असल्याने मनसे कार्यालयाबाहेर पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

त्यांच्या फोटोसह आणि नावाने जोरदार बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावरही नागरिक नाराजी व्यक्त करत असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.