Kalyan Crime : ‘त्या’ने केली पिस्तुलची टेस्ट आणि झाला अरेस्ट, कल्याणमध्ये पिस्तुल तस्कराचा हवेत गोळीबार

एक व्यक्ती कल्याणमध्ये देशी पिस्तुल विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. हा व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार मात्र तो नेमका कुठे येणार आहे याची माहिती पोलिसांना नव्हती.

Kalyan Crime : 'त्या'ने केली पिस्तुलची टेस्ट आणि झाला अरेस्ट, कल्याणमध्ये पिस्तुल तस्कराचा हवेत गोळीबार
'त्या'ने केली पिस्तुलची टेस्ट आणि झाला अरेस्ट
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:03 PM

कल्याण : टेस्टसाठी हवेत गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराला कल्याण महात्मा फुले (Mahatma Phule) पोलिसांनी अटक केली आहे. गणेश राजवंशी (Ganesh Rajvanshi) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश हा मूळचा हरियाणा राज्यातील गुडगाव येथील असून सध्या नवी मुंबईतील घणसोली येथे राहत आहे. राजवंशी हा पिस्तुल तस्कर असून तो पिस्तुल विकण्यासाठी कल्याणमध्ये आला होता. पोलीस त्याचा शोध घेतच होते. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांनी या आरोपीला गणेशकडून एक देशी पिस्तुल आणि एक देशी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. (Mahatma Phule police arrested the accused for firing in the air in Kalyan)

काळा तलाव परिसरात गोळीबार

एक व्यक्ती कल्याणमध्ये देशी पिस्तुल विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. हा व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार मात्र तो नेमका कुठे येणार आहे याची माहिती पोलिसांना नव्हती. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांनी या आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयाक केली होती. याच दरम्यान काळा तलाव परिसरात असलेल्या एका टपरीसमोर एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पाच मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र शहरातील गजबजलेल्या ठिकाणच्या पानटपरीवर हवेत गोळी बार केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिक तपास करत आहेत

आरोपीकडून एक देशी पिस्तुल, एक देशी कट्टा यासह सहा जिवंत काडतूसं हस्तगत करण्यात आल्याचे कल्याणचे एसीपी उमेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान आरोपी गोळीबार करत असताना त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात आला आहे. हा व्हिडिओ कुणी काढला ? व्हिडिओमध्ये आजूबाजूला कोण आहेत ? आरोपी पिस्चुल कुणाला विकणार होता याचा पोलीस तपास करीत आहेत. (Mahatma Phule police arrested the accused for firing in the air in Kalyan)

इतर बातम्या

Video : ‘त्या’ शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

इम्रान मेहंदीला हर्सूलच्या अंडा सेलमधून बाहेर काढा, Aurangabad खंडपीठाचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.