Mansukh Hiren Death Case | मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. (Mansukh Hiren Death Case Update)

Mansukh Hiren Death Case | मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?
मनसुख हिरेन
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 6:47 PM

ठाणे : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा काल (5 मार्च) संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मनसुख यांचा मृत्यू कसा झाला? त्यांनी आत्महत्या केली की मनसुख यांची हत्या झाली? मनसुख यांच्या मृतदेहावर एवढे रुमाल कसे आले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (Mansukh Hiren Death Case Update)

?दिवसभरात काय काय घडलं??

?शनिवार (6 मार्च) संध्याकाळी 6 वाजता : मनसुख हिरेन यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला

मनसुख हिरेन यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या समोरील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. व्यापारी आणि नातेवाईकांची घराखाली मोठी गर्दी केली आहे. तसेच पोलिसांचा फौज फाटाही तैनात करण्यात आला आहे.

?शनिवार (6 मार्च) दुपारी 3 वाजता : उच्चस्तरीय चौकशी करा, आम्हाला न्याय द्या, ठाण्याच्या व्यापारी संघाची मागणी 

मनसुख हिरेन यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचं आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी. ते फार सरळ व्यक्ती होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. रिपोर्ट काहीही येऊ दे. पण त्यांची हत्या झाली आहे. जे दोषी आहेत. जो फॉरन्सिक रिपोर्ट काही दोन महिन्यात येणार आहे. तोपर्यंत आम्ही थांबू शकत नाही. याबद्दल आम्हाला न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया ठाण्याच्या व्यापारी संघाने दिली आहे.

?शनिवार (6 मार्च) दुपारी 2.30 वाजता : कुटुंबियांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

शवविच्छेदनाचा अहवाल सादर केल्यानंतर पोलीस अधिकारी अंबुरे यांनी मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली. मात्र या अहवालात काहीही नमूद करण्यात आलेले नाही. त्यांच्या तोंडात सापडलेले रुमाल हे घरातून नेण्यात आले नाही. स्विमिंग करणारा व्यक्ती तिकडे आत्महत्या का करेल ? मनसुख हिरेन यांच्या बाबतीत निव्वळ घातपात झाला आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच जोपर्यंत याची उच्चस्तरीय चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.

?शनिवार (6 मार्च) दुपारी 2.30 वाजता : अहवालात मृत्यूचे कारण अस्पष्ट

मनसुख हिरेन यांचा मृत्यू 12 ते 14 तासांपूर्वी झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे स्पष्ट झाला आहे. पण त्यांचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झाला, हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोणताही घातपात झालेला नाही. तसेच मनसुख यांच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम नाही. तसेच कुठलाही फाऊल प्लेबाबत रिपोर्ट नाही, असे यात नमूद करण्यात आलं आहे. (Mansukh Hiren Death Case Update)

?शनिवार (6 मार्च) दुपारी 2.30 वाजता : मनसुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल कुटुंबियांकडे सुपूर्द 

मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन सहाय्यक उपायुक्त अविनाश अंबुरे हिरेन यांच्या घरी दाखल झाले. यानंतर अविनाश अंबुरे यांच्याकडून हिरेन कुटुंबियाना अहवाल दाखवण्यात आला.

?शनिवार (6 मार्च) दुपारी 1.30 वाजता : ATS च्या टीमला अलर्ट राहण्याचे आदेश

यानंतर एटीएसच्या सर्व युनिटला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. क्राईम ब्रांचकडून पेपर मिळताच तपासाला सुरुवात केली जाणार आहे. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. एटीएसचे मुंबई आणि इतर परिसरात सात युनिट आहेत. नागपाडा, काळाचौकी, जुहू, मालवणी, विक्रोळी, ठाणे आणि नवी मुंबई असे हे सात युनिट आहेत. या सर्व युनिटच्या अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज संध्याकाळी एटीएसच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 25 फेब्रुवारीला जिलेटीन असलेली कार सापडली होती. तर या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा काल मृतदेह सापडला आहे. हे दोन्ही गुन्हे काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एटीएसकडे दिले आहेत. यामुळे एटीएसचे अधिकारी अलर्ट झाले आहे. ते कागदपत्रांची वाट पाहात आहेत. कागदपत्रे मिळताच एटीएसचा तपास सुरू होणार आहे.

?शनिवार (6 मार्च) सकाळी 11.30 वाजता : ATS ची टीम घटनास्थळी 

यानंतर पोलीस पुढील चौकशीसाठी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या खाडीवर दाखल झाले. मनसुख हिरेन यांचा मृतदेहाच्या अवस्थेवरून स्थानिक लोकांनी त्यांची हत्या झाला संशय वर्तवला आहे. मृतदेह मिळाला त्यावेळी त्यांच्या तोंडावर असलेले नवे कोरे करकरीत रुमाल आणि मृतदेहाची अवस्था यावरून नागरिकांनी हा संशय व्यक्त केला आहे. यानंतर सकाळी 11.30 च्या दरम्यान ATS ची टीम त्या ठिकाणी दाखल झाली.

?शनिवार (6 मार्च) दुपारी 12.30 वाजता : मृतदेहाजवळ सुसाईड नोट किंवा मोबाईल नाही

मनसुख यांचा मृतदेह चिखलात फसलेला असल्याने बाहेर काढणे शक्य होत नव्हते. शेवटी क्रेन आणून बॉडी कपड्यात बांधून, पुन्हा दोरीने बांधून ती क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली आहे. बॉडी काढण्यासाठी आतमध्ये चिखलात भगवान पंडित नावाचा तरुण गेला होता. त्याने स्वता बॉडी बांधून बाहेर काढण्यात मदत केली. मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्यात तोंडावर मास्क होता. त्याच्या आत 6 ते 7 रुमाल होते. मात्र त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट किंवा त्यांचा मोबाईल हे त्यावेळी नव्हते. (Mansukh Hiren Death Case Update)

? शनिवार (6 मार्च) सकाळी 8.30 वाजता : खाडी परिसरात तपास 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या मुंब्रा खाडीत सापडला त्याठिकाणी आज सकाळपासून पोलिसांचा तपास सुरु करण्यात आला. जेव्हा मृतदेह खाडीतून बाहेर काढला तेव्हा त्यांच्या तोंडात 5 ते 6 रुमाल कोंबलेले होते. मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीच्या किनारी चिखलात फसलेल्या अवस्थेत होता. खाडीच्या बाजूला रेल्वे ब्रिजचे काम चालू आहे. या ब्रिजचे कामावरील सुपरवायझर वाघमारे नावाचे हे किनाऱ्यावर लघुशंका करण्यासाठी गेले असता. त्यांना प्रथम हिरेन यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने हा मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली.

?शुक्रवार (5 मार्च) संध्याकाळी 8.00 वाजता : चार डॉक्टरांच्या टीमकडून मृतदेहाचं शवविच्छेदन 

पोलिसांनी मनसुख यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणला होता. काल या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हे पोस्ट मार्टम सुरू होते. चार डॉक्टरांच्या टीमने मिळून हे पोस्टमार्टम केलं. या पोस्ट मार्टमचे चित्रीकरण देखील करण्यात आले.

?शुक्रवार (5 मार्च) संध्याकाळी 7.30 वाजता : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

?शुक्रवार (5 मार्च) संध्याकाळी 5 वाजता : मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याचे वृत्त

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. (Mansukh Hiren Death Case Update)

संबंधित बातम्या : 

Mansukh Hiren | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया

Mansukh Hiren Death | मृतदेह चिखलात पालथा, तोंडात सहा-सात रुमाल कोंबलेले, पहिल्यांदा मृतदेह पाहिलेल्या तरुणांची धक्कादायक माहिती

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.