मीरा भाईंदरमध्ये कोरोना संसर्ग वाढला; चिंता वाढल्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन, जाणून घ्या नवे नियम

मीरा भाईंदर महानगरपालिका कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलेल्या क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. (mira bhayandar corona lockdown)

मीरा भाईंदरमध्ये कोरोना संसर्ग वाढला; चिंता वाढल्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन, जाणून घ्या नवे नियम
Lockdown
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 12:20 AM

ठाणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई उपनगरांतसुद्धा कोरोना मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. शर्थीचे प्रयत्न करुनसुद्धा कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्यामुळे  मीरा भाईंदरमध्ये (Mira Bhayandar municipal corporatio) कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन (lockdown) जाहीर करण्यात आलाय. 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊनचा आदेश लागू असेल. (Mira Bhayandar municipal corporation announced lockdown in corona hotspots)

मीरा भाईंदरमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. येथील आरोग्य प्रशासन कोरोनाला थोपवण्याठी अथक प्रयत्न करत आहे. जनतेला कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येतेय. मात्र, प्रत्यक्षात या नियमांचे पालन होतना दिसत नाहीये. परिणामी येथे कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. ही परिस्थिती लक्षात घेऊन मीरा भाईंदर मनपा प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. मनपाने कोरोना प्रतिंबंधित क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. जाहीर आदेशानुसार 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील.

हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर वेगळे नियम

मीरा भाईंदर क्षेत्रामधील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर हा नियम लागू नसेल. हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट क्षेत्राबाहर सर्व हॉटल्स, रेस्टॉरंट, बार, हॉल आणि फूड कोर्ट इत्यादी ठिकाण्याच्या सेवा 50% क्षमतेसह सुर राहतील. तसेच, मॉलसहित सर्व प्रकारची दुकाने रात्री 11.00 वाजेपर्यंतच सुरू राहतील. ही माहिती मीरा भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.

दरम्यान, मीरा भाईंदर परिसरात शुक्रवारी एकूण 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला. येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजार 797 पॉझिटिव्ह पोहोचला आहे. मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत 26 हजार 199 रुग्ण बरे झाले आहेत. येथे सध्या 792 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.

इतर बातम्या :

कल्याणमध्ये काटई टोलनाका बंद, शिवसेना-मनसेत श्रेयवाद, राज्य सरकारने नेमका टोलनाका बंद का केला?

चिंतेची बाब! कोरोनाचा विळखा वाढला, राज्यात 15 हजार 817 रुग्ण सापडले

(Mira Bhayandar municipal corporation announced lockdown in corona hotspots)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.