पालिकेच्या कारभारावर नागरिक संतापले, राजकारण्यांना इमारतीमध्ये प्रवेशबंदी
Mira Road | मीरा रोड पूर्व इथ गोदावरी आणि भूमी सोसायटीच्या रहिवाशांनी हे लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदीचे बॅनर लावले आहेत. मिरारोड महापालिका निवडणूक पुढील वर्षी 2022 मध्ये होत आहे. लोकप्रतिनिधीं नगरसेवक आमदार, खासदार यांच्याकडे तक्रार करूनही पावसाळ्यातील पाणी घरात घुसत आहे आणि कुठल्याच राजकीय पक्षाचे नेते त्यांना न्याय देत नाहीयेत त्याविरोधात हे आक्रोश व्यक्त करणारे बॅनर आहेत.
मीरारोड: मीरारोड येथील रहिवाशांनी नगरसेवक आमदार खासदार यांना इमारतीत प्रवेश बंदी जारी केली आहे. मीरा रोड पूर्व इथल्या गोदावरी आणि भूमी या सोसायटीत पावसाचे पाणी दरवर्षी तळमजल्याच्या रहिवाशांच्या घरात शिरते. रहिवाशांनी या समस्येविरोधात लोकप्रतिनिधींना आणि महापालिकेला सांगूनही तक्रारीकडे दखल घेतली जात नसल्यामुळे मीरा रोड मधल्या रहिवाशांनी राजकारण्यांना सोसायटीत प्रवेश बंदी जारी केलीय.
मीरा रोड पूर्व इथ गोदावरी आणि भूमी सोसायटीच्या रहिवाशांनी हे लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदीचे बॅनर लावले आहेत. मिरारोड महापालिका निवडणूक पुढील वर्षी 2022 मध्ये होत आहे. लोकप्रतिनिधीं नगरसेवक आमदार, खासदार यांच्याकडे तक्रार करूनही पावसाळ्यातील पाणी घरात घुसत आहे आणि कुठल्याच राजकीय पक्षाचे नेते त्यांना न्याय देत नाहीयेत त्याविरोधात हे आक्रोश व्यक्त करणारे बॅनर आहेत. या बॅनर वर लिहिलं आहे आमच्या सोसायटीत तुम्हाला प्रवेश बंदी आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे तुम्ही आमच्या सोसायटीत यायचं नाही असा राग व्यक्त करणारा हा बॅनर आहे. गेली कित्येक वर्ष सोसायटीतल्या रहिवाशांनी लोकप्रतिनिधींकडे दात मागूनही न्याय मिळाला नाही म्हणून अखेर हे बॅनर आपल्या सोसायटीवर लावले आहेत.
येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवकांना याबद्दल विचारले तर त्यांनी लोकांचं म्हणणं योग्य आहे महापालिका त्यांच्या प्रश्नाकडे बघत नसल्यामुळे तो राग त्यांनी व्यक्त केलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दखल घेतली नाही तर ही लोकचळवळ पालिका निवडणुकीच्या बहिष्कार या पर्यंत पोहोचू शकते, असा इशाराही इथल्या स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
संबंधित बातम्या:
मुंबईत सर्वाधिक दरड कोसळण्याच्या घटना भांडुपमध्ये, 24 पैकी 21 वॉर्ड दरडीच्या छायेत
डोक्यावर मुसळधार पाऊस, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं, ठाण्याचे पालिका आयुक्त भर पावसात रस्त्यावर