भिवंडी: भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्डे न बुजवताच टोल वसुली सुरू ठेवल्याने संतप्त झालेल्या मनसे सैनिकांनी आज भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका फोडला. यावेळी मनसे सैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (MNS activists vandalize toll naka in Bhiwandi)
भिवंडी-ठाणे रस्त्यावरील टोल नाका अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यानी फोडला. आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर येऊन जोरदार घोषणाबाजी करत हा टोल नाका फोडला. त्यानंतर काही वेळ घोषणा देऊन हे कार्यकर्ते निघून गेले. 1 रोजी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर श्राद्ध आंदोलन केलं होतं. रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा टोल वसुली बंद करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली होती. मात्र, त्यानंतरही काहीच पावलं उचलण्यात आली नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
भिवंडी ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा बराच वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय या रस्त्यावर अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आधी इशारा आंदोलन करून प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, खड्डे दुरुस्ती न झाल्याने त्यांना आज आंदोलन करावं लागलं.
यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी मनसेने खारबाव कामण रस्त्यावरील टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळेच आजचं हे आंदोलन झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी फाटा या दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनांसोबतच निवेदने देण्यात आली होती. मात्र, निवेदने देऊनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. याच कारणामुळे ऑगस्टमध्ये मनसे सैनिकांनी टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली होती.
अंजुरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी फाटा या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करावी. रस्त्याची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी या टोलनाक्यावर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली होती. परंतु मनसेने इशारा देऊनही पुन्हा टोलवसुली सुरू करण्यात आली. याची कुणकुण मनसे सैनिकांना लागताच शुक्रवारी दुपारी बारा वाजता मनसैनिकांनी मालोडी परिसरातील टोलनाक्याची तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी हातातील लाकडी काठ्यांनी टोल वसूल करणाऱ्या कॅबिनीची तोडफोड केली. तसेच तोडफोड करुन घटनास्थळावरुन पोबारा केला होता. (MNS activists vandalize toll naka in Bhiwandi)
VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 20 September 2021https://t.co/Ayaqym7mfn#FastNews #Mahafast100 #KiritSomaiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
संबंधित बातम्या:
दोन महिन्यांचं वीजबिल भरलं नाही, वीज कापताच पोलिसाची महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
दोस्त दोस्त ना रहा, मित्रच बनला शत्रू, उल्हासनगरात हत्येची दुसरी घटना, कारण फक्त…
(MNS activists vandalize toll naka in Bhiwandi)