Raju Patil : केडीएमसीमधील 27 गावांत सुविधा नाही तर कर नाही, मनसे आमदार राजू पाटील यांचे नागरिकांना आवाहन
या गावांवर अन्याय होतो, पालिकेने या गावांकडे दुर्लक्ष केलं, कोव्हीड काळात कोणतीही सुविधा या गावांना देण्यात आली नाही, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं जातंय. मात्र पालिकेची कर वसुली सुरू आहे. गावांना सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. रस्त्यांची दुरवस्था व पाणी टंचाई यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 18 गावांना महापालिकेकडून मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र कर वसुली (Tax Recovery) केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत आज मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) उद्यापासून या गावांमध्ये सुविधा नाही तर कर नाही हे आंदोलन (Protest) सुरू करणार आहेत. 18 गावांध्ये सुविधा नाही तर कर नाही या आशयाचे बॅनर लावून आपण स्वतः नागरिकांना कर न भरण्याचे आवाहन करणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. कल्याण डोंबवली महापालिकेतील 27 गावांपैकी 18 गावे वगळण्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर हे पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केलाय.
मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं जातंय
या गावांवर अन्याय होतो, पालिकेने या गावांकडे दुर्लक्ष केलं, कोव्हीड काळात कोणतीही सुविधा या गावांना देण्यात आली नाही, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं जातंय. मात्र पालिकेची कर वसुली सुरू आहे. गावांना सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. रस्त्यांची दुरवस्था व पाणी टंचाई यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर सुविधा नाही तर कर नाही हे आंदोलन घेण्यात येणार असून याबाबत मी स्वतः नागरिकांना कर न भरण्याबाबत आवाहन करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. (MNS MLA Raju Patil will agitate for facilities in 27 villages of KDMC)