Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं

पाकिस्तानी कलावंताना ढुंगणावर लाथ मारणारा पक्ष कोणता होता, हे आठवा. हे आपल्याकडे येऊन गाणी गात होते, चित्रपटात काम करत होते, यांना हाकलवणारा माझे मनसैनिक होते. रझा अकादमीविरोधात मोर्चा काढला. आमच्या पोलिस भगिनींनी मारले, घोळका घोळका करुन त्यांना घ्यायचे. त्यांना शारिरीक त्रास दिला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, जाळल्या. कुणी प्रतिक्रिया नाही दिली.

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं
यांचे दाखवायचे 'सुळे' वेगळे, राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:28 PM

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यात उत्तर सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)वर जोरदार निशाणा साधला. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत वक्तव्य केले होते. यानंतर मशिदीवरील भोंगे आणि मुस्लिम समाज यावरुन राजकीय घमासान पहायला मिळाले होते. याला राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उत्तर दिले आहे. मनसेचे नाशिकमधील मुस्लिम नेते सलीम मामा शेख हे सभेत व्यासपीठावर उपस्थित होते. राज ठाकरे यांनी सलीम मामू शेख बसलेत इथे.. उभा राहा.. असे सांगितले. याच्या मतदारसंघात 95 टक्के हिंदू लोकं राहतात, पण सलीम निवडून आला. याचं कारण हे मराठी मुसलमान. या देशातले प्रामाणिक मुसलमान, पण ते या लोकांमुळे भरडले जात आहेत. अतिरेकी लोकांमुळे भरडले जात आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. (MNS president Raj Thackeray targeted the Mahavikas Aghadi from the Muslim community vote)

राज ठाकरे यांचा शरद पवारांवर निशाणा

राष्ट्रवादीनं मला सांगावं की मी भूमिका बदलतो म्हणून? पवार साहेबांनी सांगावं? हेच पवार ज्यावेळी सोनिया गांधींना परदेशी पंतप्रधान बोलले होते. खरंतर परदेशी पंतप्रधान बोलणारी पहिली व्यक्ती माननीय बाळासाहेब होते. शरद पवार 199 ला काँग्रेसमधून बाहेर पडले कारण सोनिया गांधी परदेशी पंतप्रधान नको म्हणून. निकाल लागल्यानंतर पुन्हा सोबत गेले, कृषी मंत्री झाले. दोन महिन्यांतच भूमिका बदलली. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली. हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही सांगितलीये, असे बोलत राज ठाकरे यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.

राज ठाकरेंकडून मनसेच्या कामगिरीला उजाळा

पाकिस्तानी कलावंताना ढुंगणावर लाथ मारणारा पक्ष कोणता होता, हे आठवा. हे आपल्याकडे येऊन गाणी गात होते, चित्रपटात काम करत होते, यांना हाकलवणारा माझे मनसैनिक होते. रझा अकादमीविरोधात मोर्चा काढला. आमच्या पोलिस भगिनींनी मारले, घोळका घोळका करुन त्यांना घ्यायचे. त्यांना शारिरीक त्रास दिला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, जाळल्या. कुणी प्रतिक्रिया नाही दिली. मनसेनं फक्त मोर्चा काढला. मुंबईचे कमिशनर अरुण पटनायक पोलिसांनाच सांगायला लागले की यांना मारायचं नाही. त्यांना काहीही करायचं नाही. हा मोर्चा मुळात अरुण पटनायकांना कमिशनर पदावरुन काढण्यासाठी होता. त्यांना सरकारला काढावंच लागलं होतं. अगोदरच्या गोष्टी विसरुन गेला असाल, तर आठवण करुन देतो. गुढीपाडव्याच्या सभेनंतर एकदम पुढे आले, असे सांगत राज ठाकरे यांनी मनसेच्या कामगिरीबद्दल आठवण करुन दिली. (MNS president Raj Thackeray targeted the Mahavikas Aghadi from the Muslim community vote)

इतर बातम्या

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंनी कारणावर बोट ठेवलं

Raj Thackeray Thane Speech : भोंग्ये हटवण्यासाठी राज ठाकरेंची डेडलाईन ते मोदींकडे दोन मोठ्या मागण्या, वाचा ठाण्यातल्या सभेतले 12 मोठे मुद्दे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.