नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी नेते मंडळीची कान उपटणी केली आहे. विधानसभा सदस्यांचे वर्तन चुकीचं आहे, असेच चालू राहील तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येणार, अशी काळजी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे.

नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले
नरहरी झिरवळांनी नेत्यांचे कान उपटले
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:06 PM

ठाणे : राज्यात सध्या मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. किरीट सोमय्या आणि संजय राऊत रोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. तर दुसकडे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) भाजपवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. याच वादाचे पडसाद येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly Session) दिसून येण्याची शक्यता आहे. कारण याआधीची अधिवेशनं सुद्ध अशाच वादात गेली आहेत. जनतेचे मुद्दे राहतात बाजुला. मात्र नेत्यांची जुंपल्याचे दिसून येते. यावरूनच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी नेते मंडळीची कान उपटणी केली आहे. विधानसभा सदस्यांचे वर्तन चुकीचं आहे, असेच चालू राहील तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येणार, अशी काळजी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे. अधिवेशावेळी एवढा मोठा पॉलिटिकल राडा झाला होता की त्यानंतर भाजपच्या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे निलंबन रद्द ठरवलं आहे.

लवकरच सर्वपक्षीयांची बैठक बोलवणार

येत्या अधिवेशना आधी लवकरच सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावणार अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली आहे. आजच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना भाषेचा स्तर खाली गेलाय, यासह सभागृहात सदस्यांचे वर्तन याबाबत प्रतिक्रीया देताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सध्या जे काही चाललं आहे ते चुकीचं आहे आणि असच सुरू राहील तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येणार. त्यामुळे याबाबत मी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक लवकरच बोलावणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या बैठकीने तर राजकारण शांत होणार का, हेही पाहणं तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.

जनतेचा पैसा वाया घालवू नका

अधिवेशनात यंदा फक्त 6 दिवस सेशन चाललं. मात्र त्यातही एखादा प्रश्न उपस्थित झाला की मागचं काही तरी काढून वेळ वाया घालवण्यात आला. या नेत्यांच्या टाइमपासमुळे यामध्ये प्रत्येक मिनिटाला जनतेचे पैसे खर्च होत आहेत .अशी खंत व्यक्त करत याचा विचार सर्व पक्षीय नेत्यांनी केला पाहिजे, असे मत नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या अनेक अधिवेशनाच राज्यातल्या राजकीय मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनसामने येताना दिसून आले. याआधीच्या अदिवेशनात कोरोनामुळे अधिवेशनही पूर्ण वेळ घेता आले नाही. अशातच वेळ कमी असताना हा पॉलिटिकल राडा झाल्याने त्याची भुर्दंड थेट जनतेला बसत आहे. त्यामुळेच झिरवळांनी ही चिंता व्यक्त केली आहे.

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?

काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या

तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही, येणार तर मोदीच-रामदास आठवले

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.