ठाणे: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले असतानाच राज्यातील जनतेसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. ठाण्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा झाला असून त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्यस्थितीत ओमिक्रॉनचा संसर्ग कमी असून शहरातील बाधित रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तात्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. महापालिकेच्या रूग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने ठाण्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आज बरा होवून घरी परतला आहे. 12 दिवसापूर्वी सदर रुग्णाची ओमिक्रॉनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर ठाणे महापलिकच्या पार्किंग प्लाझा रूग्णालयात उपचार सुरु होते. आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे रुग्णाची आज करण्यात आलेली चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी सदर रुग्णाने महापालकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या अद्ययावत सुविधांबाबत प्रशासनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान, परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती महापालिका प्रशासनास द्यावी. तसेच ओमिक्रॉनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून योग्य उपचार दिला जात आहे. रुग्णांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठाण्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता सात वर गेली आहे. शहरात ओमिक्रॉनचा प्रसार होत असल्याने महापालिकेच्या चिंतेत भर पडली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. घाणामधून ठाण्यात चार जण आले होते. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ते सर्वजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांची ओमिक्रॉनची देखील चाचणी करण्यात आली. ओमिक्रॉनचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आल्याने आता ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे.
ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार पोहोचली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, आवश्यक त्या उपयायोजना राबवण्यात येत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Video : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 28 December 2021 https://t.co/Duu5fM44bm @OfficeofUT @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #Headlines #Tv9Marathi #SuperfastNews #MahafastNews #fastnews #DistrictNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2021
संबंधित बातम्या:
शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची मर्सिडीज उलटली, मुलगा जखमी, कल्याण-शीळ रस्त्यावर विचित्र अपघात
धाकधूक वाढली! ठाण्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या सात वर; घाणामधून आलेल्या चार जणांना लागण